Share

ट्रॅफिक नियम तोडल्यास लायसन्समधून पॉईंट्स वजा; गडकरींचा मोठा प्लॅन

नितीन गडकरींच्या प्रस्तावित ग्रेडेड पॉईंट सिस्टममुळे वाहतूक नियम तोडल्यास ड्रायव्हिंग लायसन्सवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

Published On: 

Nitin Gadkari Driving licence new rules

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या निर्णयांमुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी आता आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयाचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) आणि वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रांबाबत मोठे बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. मंत्रालय सध्या परिवहन क्षेत्रात ‘ग्रेडेड पॉइंट सिस्टम’ लागू करण्याबाबत विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’च्या (SIAM) ६६ व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना गडकरी यांनी या संपूर्ण योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, आता वाहतूक नियमांचे उल्लंघन थेट लायसन्सच्या रेकॉर्डशी जोडले जाणार आहे.

Nitin Gadkari Driving licence new rules

थोडक्यात सांगायचे तर, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर होईल. या प्रस्तावित प्रणालीनुसार, नियमांचे उल्लंघन केल्याची नोंद केली जाईल आणि लायसन्समधून ठराविक पॉइंट्स वजा केले जातील.

शिवाय, जर हे दंड गुण एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाले, तर संबंधित अधिकाऱ्यांना चालकाचा परवाना निलंबित करण्याचा किंवा कायमस्वरूपी रद्द करण्याचा अधिकार असेल.

दरम्यान, या प्रणालीमध्ये काही सकारात्मक बाबींचाही समावेश असेल. ही प्रणाली केवळ दंडात्मक उपाययोजनांपुरती मर्यादित नाही. तर जबाबदारीने वाहन चालवणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या परवानाधारकांना पुरस्कृतही केले जाईल.

ज्या चालकांचा वाहन चालवण्याचा रेकॉर्ड स्वच्छ असेल, त्यांना विमा कंपन्यांकडून विशेष सवलती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या पुरस्कारांचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मंत्री गडकरी यांनी भारताच्या रस्ते सुरक्षा प्रणालीसमोरील आव्हानांबाबतही आपली मते मांडली. “भारतात रस्त्यांवर वाहतूक करताना सुरक्षेचा विचार करता चालकांचे वर्तन हा सर्वात मोठा आव्हानाचा मुद्दा आहे. त्यावर आळा घालण्यासाठी आता एकदा चलन कापून भागणार नाही. तर त्याशिवाय अतिरिक्त कारवायाही केल्या जाणार आहे.” असे नितीन गडकरी म्हणाले.

“त्यासाठीच ‘ग्रेडेड पॉईंट सिस्टीम’ या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. यामधून वेगमर्यांदा ओलांडणे, सिग्नल तोडून पळ काढणे, अशा सर्व धोकादायक कृत्यांची एकत्रित नोंद केली जाणार आहे. या चुका करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल. त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.” असेदेखील गडकरी यांनी भाषणात नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही