Share

‘माजोरड्या, बिनडोक लोकांना…’; विद्यानंद बापटांवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री संतापली!

ध्वनीप्रदूषणाविरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा अभिनेत्री आरती सोलंकीकडून तीव्र शब्दांत निषेध.

Published On: 

Marathi Actress Aarti Solanki post on Vidyanand Bapat attack

सण उत्सवाच्या नावाखाली डीजेचा दणदणाट सुरू असताना, आवाज उठवणाऱ्यालाच मारहाण झाली तर? पुण्यात नेमकं हेच घडलंय. ध्वनीप्रदूषणाविरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांच्यावर हल्ला झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

बापट यांच्यावरील या भ्याड हल्ल्यानंतर अभिनेत्री आरती सोलंकी (Aarti Solanki) प्रचंड संतापली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हल्लेखोरांचा खरपूस समाचार घेतलाय. तिने उपरोधिक शैलीत बापटांना एक खास विनंती केलीय.

Aarti Solanki on Vidyanand Bapat Attack

आरतीने लिहिलंय, “विद्यानंद बापट यांना कळकळीची विनंती आहे. फार स्पष्ट मराठी बोलू नका.” डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात बोलत असताना, काही अशिक्षित, माजोरड्या आणि बिनडोक लोकांना वाटतंय की तुम्ही गणपती बाप्पाच्या विरोधात बोलत आहात.

थोडक्यात सांगायचं तर, बापट यांचा विरोध गणेशोत्सवाला नसून जीवघेण्या डीजेला आहे. पण याचा विपर्यास केला जातोय. ज्याने हल्ला केला, त्यावरून त्याचे संस्कार आणि शिक्षण दिसून येतं, असा थेट टोला आरतीने लगावला आहे.

उत्सव साजरा करण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण दुसऱ्याला त्रास देऊन सण साजरा करणं कितपत योग्य? सामाजिक मुद्द्यावर मतभेद असू शकतात. पण त्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबणं अत्यंत चुकीचं असल्याचा स्पष्ट संदेश या घटनेतून मिळतो.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही