विद्यानंद बापट पुणेकर नाहीतच! रुपाली ठोंबरे पाटलांचा गौप्यस्फोट, ‘७ वर्षांपूर्वी आलेल्यांनी आम्हाला…’

पुण्यात डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी जोरदार टीका करत त्यांच्या पुणेकर असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Published On: 

Rupali Thombre Patil criticizing Vidyanand Bapat over Pune Ganeshotsav DJ dispute

Rupali Thombre: पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात डीजे आणि लाऊडस्पीकरला विरोध करणारे (Pune Ganeshotsav DJ dispute) विद्यानंद बापट सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर आता शहरातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट बापट यांच्या ‘पुणेकर’ असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे.

गुरुवारी टिळक रोड परिसरात एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना संतोष चव्हाण नावाच्या व्यक्तीने बापट यांच्या मुस्काटात लगावली होती. या घटनेनंतर पुण्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे, रुपाली पाटील यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहित बापट यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. सात वर्षांपूर्वी नोकरीसाठी रत्नागिरीतून पुण्यात आलेल्या माणसाने आम्हाला गणेशोत्सव कसा साजरा करावा, हे अजिबात शिकवू नये, असा थेट टोला त्यांनी लगावला आहे.

Rupali Thombre criticizing Vidyanand Bapat 

‘पुण्याचा गणेशोत्सव आमचा अभिमान, इथली संस्कृती समजून घ्या!’

पुण्याचा गणेशोत्सव आणि त्यामागची १३० वर्षांची वैभवशाली परंपरा अधोरेखित करताना रुपाली पाटील चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या मते, विद्यानंद बापट हे मूळचे पुणेकर नसल्यामुळेच त्यांना बाप्पाच्या उत्सवाला गालबोट लावण्याची हिंमत झाली. पुणे म्हणजे काय, हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं. पेठांमधील घराघरांतून आणि दुकानांमधून वर्गणी गोळा करून हा उत्सव साजरा करण्याची पुण्याची एक वेगळीच शान आहे.

इथे ढोलाच्या तालावर अनेक कार्यकर्त्यांचं बालपण गेलंय, त्यामुळे हा फक्त ‘डीजे’चा विषय नाही, असं त्या स्पष्टपणे म्हणाल्या. थोडक्यात सांगायचं तर, केवळ नाहक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पुण्याचे नाव खराब करू नका, असा इशाराच पाटील यांनी दिला आहे. पुण्यात राहायचं असेल, तर आधी इथली संस्कृती समजून घ्यावी लागेल. पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवतील आणि हा गणेशोत्सव त्याच जोशात पार पडेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही