‘पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करून दाखवा’; फडणवीसांना सपकाळांचे थेट चॅलेंज

हर्षवर्धन सपकाळ यांनी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचे आव्हान देत फडणवीसांवर निशाणा साधला.

Published On: 

Harshvardhan Sapkal targets Devendra Fadnavis

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, या कार्यक्रमावरून त्यांच्यावर टीकाही झाली. ‘खरे तर महिला आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यांनी आधी प्रियंका गांधी यांना संधी द्यायला हवी होती’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली होती. फडणवीस यांच्या या विधानाला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘महिलांना संधी देण्याचा ढोंगी उपदेश करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मुख्यमंत्री करून दाखवावं,’ असे थेट चॅलेंज हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणविसांना दिले आहे.

Harshvardhan Sapkal targets Devendra Fadnavis

हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट करत लिहिले की, ‘कौन राहुल?’ म्हणणाऱ्यांची अवस्था आता अशी झाली आहे की जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना फक्त राहुल गांधीच दिसत आहेत. ‘छात्रों की गूंज’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजपची झोप उडाली आहे आणि यावरून देवेंद्र फडणवीस संतापले आहेत.

हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, “महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा डाव रचून देशाचे राजकीय गणित बदलण्याचा भाजपाचा मनसुबा काँग्रेसने हाणून पाडला, म्हणूनच फडणवीसांना एवढी मिरची झोंबली आहे. महिलांना संधी देण्याचा ढोंगी उपदेश करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करून दाखवावे! आणि वंदे मातरमवर राजकारण करण्यापूर्वी RSS च्या शाखेत ते गायला सुरू करावे.”

“फडणवीस साहेब, खोट्याची कितीही फेकाफेक केली तरी राहुल गांधींचा झंझावात थांबणार नाही. जरा वास्तव स्वीकारा आणि स्वतःच्या राजकीय अस्वस्थतेवर उपचार करा, गेट वेल सून फडणवीस साहेब..!,” असा टोमणा सपकाळ यांनी फडणवीस यांना मारला.

“महिलांना स्था. स्व. संस्थेत ३३% आरक्षण काँग्रेसनेच दिले, महिला आरक्षण २०२३ मध्येच मंजूर, विरोध आहे तो देशाचे तुकडे पाडणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाला,” असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही