‘वंदे मातरम’ या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. सोनिया गांधी यांना ‘वंदे मातरम’ विषयावरील एक पुस्तक पाठवल्यानंतर वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
“देशाच्या सन्मानासाठी १०० वेळा वेडी व्हायला तयार आहे,” असे ठामपणे सांगत वाघ यांनी वडेट्टीवार यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. तसेच, आता आपण त्यांना भारतीय संविधानाची प्रत पाठवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
Chitra Wagh Vande Mataram controversy Vijay Wadettiwar
भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमच पुस्तक पाठवून राष्ट्रगानासाठी सन्मान राखायला सांगणे, हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेधळेपणा ठरतो का? वंदे मातरमचा अपमान सहन न होणे, जर वेडेपणा असेल, तर होय मी या देशाच्या सन्मानासाठी १०० वेळा वेडी व्हायला तयार आहे.”
पहिली गोष्ट मला वेडी, वेंधळी म्हणणारे तुम्ही किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात. हे तुमच्या नीच भाषेतून महाराष्ट्राला दिसले आहे. दुसरी गोष्ट माझ्या नवऱ्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुमचा तोल पूर्णपणे गमावला आहे. ज्या न्यायालयावर देशाचा विश्वास आहे, त्या न्यायालयाने माझ्या पतीला निर्दोष मुक्त केले आहे,” असा संताप वाघ यांनी केला.
चित्रा वाघ यांनी न्यायव्यवस्थेवरून विजय वडेट्टीवार यांची चक्क अक्कल काढली. “न्यायव्यवस्थेचा निर्णय मान्य करण्याची अक्कल तुमच्यात आहे का? की सोनिया गांधींची चाटूगिरी करताना देशाच्या न्यायालयाचा विसर पडला आहे. माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया वाघ यांनी व्यक्त केली.
पुढे त्या म्हणाल्या की, “अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला, तर तुम्ही माझ्या कुटुंबावर आलात. यावरुन सिद्ध होते की, वंदे मातरमचा आदर करण्याची दानत तुमच्यात नाही,” अशी टीका त्यांनी केली.
“विजय विजय वडेट्टीवार तुमची ही असभ्य भाषा, खोटे आरोप मला गप्पं करू शकत नाही. सोनिया गांधी यांना वंदे मातरमचे पुस्तक पाठवले. आता तुम्हाला मी भारतीय संविधानाची प्रत पाठवते ती नीट वाचा आणि मगचं बंद थोबाड उघडा,” असा जोरदार टोमणा चित्रा वाघ यांनी वडेट्टीवार यांना मारला.
📌 महत्वाच्या बातम्या
- Narendra Dabholkar Case: सचिन अंदुरेला मुंबई हायकोर्टाकडून जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
- भाजपच्या नव्या टीममध्ये मोठे बदल; विनोद तावडेंवर उत्तर प्रदेशाची जबाबदारी
- “पुण्याबाबत आमचा अंदाज चुकला”; वाहतूक कोंडीवर गडकरींची मोठी कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











