Share

‘निर्लज्ज लोक आहेत, यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे’ : संजय राऊत

नाशिक-रायगडच्या पालकमंत्रिपदावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत ‘अकलेचा दुष्काळ’ असा टोला लगावला.

Published On: 

Shivsena Sanjay Raut criticizes BJP

Mumbai : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदांबाबत (Guardian Minister) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.

रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे.

Shivsena Sanjay Raut criticizes BJP

नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष जल्लोष करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपने (Bjp) आयोजित केलेल्या या जल्लोषावर कडक टीका केली. पालकमंत्रीपद मिळाल्याबद्दल इतका मोठा जल्लोष करण्याची काय गरज आहे, असा सवाल करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

नाशिक आणि रायगडसाठीच्या नियुक्त्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. त्याबाबतचा विषय दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय का बनला, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. या निर्णयामागे राजकीय तडजोड असल्याचा आरोप करत राऊतांनी सरकारवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले की, “हे निर्लज्ज लोक आहेत. त्यांना पालकमंत्रीपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे का? यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे. ते म्हणतात की हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तरीही या दोन जिल्ह्यांचा वाद अमित शहा आणि पंतप्रधानांपर्यंत नेण्यात आला. तिथे एक तडजोड झाली किंवा मुंबईच्या भाषेत मांडवली झाली.”

गिरीश महाजन यांच्याबद्दल आपल्याला कोणताही वैयक्तिक द्वेष नाही, असे राऊतांनी सांगितले. राऊत यांनी विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि नाशिकमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून त्यांच्यावर निशाणा साधला. पालकमंत्री म्हणून महाजन यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळवण्यावर आणि कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही