Share

‘मुंडे साहेब भाजपच्या जाचाला कंटाळले होते’; महादेव जानकरांचा मोठा दावा

गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळले होते आणि काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करत होते, असा दावा महादेव जानकर यांनी केला.

Published On: 

Gopinath Munde and Mahadev Jankar

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले होते. मुंडे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या विचारात होते आणि सोनिया गांधींनी त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदीलही दाखवला होता.

मात्र, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या हालचालीला विरोध केल्यामुळे तो प्रवेश होऊ शकला नाही, असा दावा चव्हाण यांनी केला होता. आता महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी चव्हाण यांच्या या विधानाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. जानकर यांनी सांगितले की, ‘गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार होता, गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळले होते.’

Gopinath Munde and Mahadev Jankar

“एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर या विषयावर चर्चा करणे योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाण हे एक चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही डाग नाही. ते मोठे नेते आहेत. पण, आज मुंडे साहेब हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आता बोलणे मला योग्य वाटत नाही. त्या काळात नेमके काय घडले याची मला सविस्तर माहिती नाही.

परंतु त्यावेळी भाजपच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार गोपीनाथ मुंडे यांचा सुरू होता. नेमके काय घडले हे मी सांगू शकत नाही, कारण त्या बैठकांना मी उपस्थित नव्हतो. तरीही, एक गोष्ट निश्चित आहे की, मुंडे साहेब हे भाजपच्या जाचाला कंटाळे होते,” असा दावा जानकर यांनी केला.

चव्हाण यांची भूमिका बदलली

दरम्यान, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण मनमोहन सिंग यांनी त्यात अडथळा आणला, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र, नंतर त्यांनी आपल्या या विधानावरून माघार घेतली आणि आपली चूक झाल्याचे मान्य केले. चव्हाण यांनी पुढे स्पष्ट केले की, संसदीय संकेतांनुसार, एखाद्या व्यक्तीला पक्षात घेण्याचा अधिकार पक्षध्यक्षांकडे असतो, तर कोणाला मंत्री म्हणून नियुक्त करायचे याचा निर्णय पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री घेतात.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही