Manoj Jarange Health: मराठा आरक्षणासाठी रान उठवणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी चिंताजनक बातमी समोर आली आहे. जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना चक्कर, ताप आणि मळमळ असा त्रास जाणवू लागलाय. अशक्तपणा प्रचंड वाढला आहे. त्यामुळेच त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात रुग्णालयात नेण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करणार आहे.
Manoj Jarange Patil Health News Update
नुकताच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा मोठा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सांगली, सातारा, सोलापूर आणि धाराशिवमध्ये अनेक गाठीभेटी घेतल्या. मराठा आरक्षणाबाबत गावोगावी इशारा बैठका घेतल्या. हा प्रवास प्रचंड धावपळीचा होता.
रात्री दोन-दोन वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुरू असायच्या. सततची दगदग. प्रवासाचा ताण. आणि विश्रांतीचा अभाव. याचाच थेट परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच त्यांना तीव्र अशक्तपणा आला आहे.
दुसरीकडे, कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्द्यावरून जरांगे चांगलेच आक्रमक झालेत. या दौऱ्यात त्यांनी सरकारवर जोरदार तोफ डागली. यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी थेट व्यंगात्मक टीका केली होती. त्यामुळे आधीच राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यात आता जरांगेंची तब्येत बिघडल्याने मराठा आंदोलकांची चिंता आणखी वाढली आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- Blinkit, Zepto अन् Instamart वर कारवाईचा बडगा; मुंढेंच्या धाडसत्राने उडाली खळबळ
- “बावनकुळे साहेब, मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून रडकुंडीला आलात” : मनोज जरांगे
- परदेशात भारतीय सुरक्षित नाहीत? ५ वर्षांत हल्ले तब्बल ७ पटीने वाढले; केंद्र सरकारचा राज्यसभेत मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











