Share

महिलांनो सावधान! ‘लाडकी बहीण योजने’च्या नावाने बनावट लिंकद्वारे मोठी फसवणूक; सरकारचे मोठे स्पष्टीकरण

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोफत इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार असल्याचा व्हायरल मेसेज बनावट असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana electric scooter Fake message goes viral

Ladki Bahin Yojana : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक संदेश वेगाने पसरत आहे, ज्यामुळे महिलांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. या संदेशात असा दावा केला जात आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अर्ज भरताच महिलांना मोफत इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) मिळेल.

असे दिसून आले आहे की, या आमिषाला बळी पडून अनेक महिला त्या लिंकवर क्लिक करत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकारामागे एक मोठा घोटाळा दडला आहे. या सोशल मीडिया संदेशामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नेमके काय घडत आहे आणि यामुळे तुमच्या सुरक्षेला कसा धोका निर्माण होऊ शकतो, हे आपण समजून घेऊया…

Ladki Bahin Yojana electric scooter Fake message goes viral

या व्हायरल संदेशात एका विशिष्ट वेबसाइटची लिंक दिली आहे. तपासात असे आढळले की, ही माहिती पसरवणाऱ्या फेसबुक पोस्ट्स आणि संदेशांमध्ये ‘Jobsvalaa’ नावाच्या वेबसाइटवरील एका फॉर्मचा उल्लेख केला गेला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’शी या फॉर्मचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी अशा बनावट लिंक्स आणि अनधिकृत फॉर्म्सचा वापर केला जातो. या पद्धतीचा वापर करून सायबर गुन्हेगार महिलांची वैयक्तिक माहिती तसेच अत्यंत संवेदनशील आर्थिक माहिती गोळा करण्याचा कट रचत आहेत. जर अशी माहिती अनोळखी व्यक्तींच्या हाती लागली, तर बँक खात्यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून सत्याचा खुलासा करण्यात आला आहे. तसेच एक महत्त्वपूर्ण व सविस्तर स्पष्टीकरण जारी केले आहे. ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत मोफत ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ वाटपाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, असे सरकारने स्पष्टपणे नमूद केले आहे.

तसेच, नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दिल्या जाणाऱ्या अशा खोट्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासन वारंवार महिलांना करत आहे.

कोणतीही अधिकृत योजना किंवा माहिती केवळ ‘.gov.in’ किंवा ‘.nic.in’ ने संपणाऱ्या अधिकृत पोर्टलवरच उपलब्ध असते, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, अशा कोणत्याही संशयास्पद किंवा थर्ड-पार्टी वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती भरू नका. अन्यथा, तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही