Share

नाशिकमधील खड्ड्यांवरून राजकारण तापलं; आदित्य ठाकरे-संजय राऊत आज पाहणी दौऱ्यावर

शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये थेट रस्त्यावर उतरले आहेत.

Published On: 

Aaditya Thackeray-Sanjay Raut inspect Nashik roads

नाशिक : नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेवर टीका होत आहे. खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि रस्ते बंद करावे लागल्याने आतापर्यंत सहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आज महापालिकेविरुद्ध आंदोलन करणार आहे. त्याच वेळी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत असून, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्यांनी आपला विरोध दर्शविला आहे.

Aaditya Thackeray-Sanjay Raut inspect Nashik roads

शहरातील नागरिकांची गैरसोय आणि समस्या लक्षात घेऊन, शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते खड्डेमय भागांची पाहणी करतील आणि नागरिकांशी संवाद साधतील.

खड्ड्यांची समस्या गंभीर होत असताना, सुरुवातीला शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेत्यांनी भाजपविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तेतील भागीदार असल्याने त्यांच्या विरोधात फारशी धार नव्हती. ठाकरे गटाने ही बाब अचूकपणे हेरली आहे.

यापूर्वीच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्यांनी मंत्री गिरीश महाजन, महापौर आणि महापालिका आयुक्त यांना थेट लक्ष्य केले होते. ठाकरे गटाने १७ ऑगस्ट रोजी निषेध मोर्चाचे नियोजन केले आहे. त्याआधी जनमत तयार करण्यासाठी पक्षाचे नेते शहरात येत आहेत.

या मुद्द्यावरील भूमिकेबाबत ठाकरे गटाने शिंदे गटाच्या शिवसेनेसमोर राजकीय पेच निर्माण केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या या अडचणीच्या स्थितीचा फायदा घेत आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. परिणामी, खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शहरातील राजकारण तापले असून, यात शिवसेना (ठाकरे गट) आघाडीवर आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही