Share

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय; मुद्रांक शुल्क माफ, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मुद्रांक शुल्क माफी, शेतकरी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Published On: 

Maharashtra cabinet announces 8 major decisions

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. (Maharashtra Cabinet Meeting Decision) या बैठकीत भूसंपादन मोबदला, महाराष्ट्रातील ऊर्जा प्रकल्प, कृषी विभागातील चार पदांची निर्मिती आणि भांडवली खर्च यांबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

१. (महसूल विभाग)
भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा झाल्यास, देण्यात येणाऱ्या व्याज दरांत सुधारणा करण्यात येणार आहे. भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ७२ मध्ये सुधारणा करण्यात येणार.

२. (महसूल विभाग)
नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपन्यांचा समूह किंवा विशेष वहन यंत्रणा (Special Purpose Vehicles (SPVs) कंपन्यांमधील अंतर्गत जमीन हस्तांतरणाच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात माफ करण्याचा निर्णय.

३. (महसूल विभाग)
नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांकरीता खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कात २५ % सूट.

Maharashtra cabinet announces 8 major decisions

४. (कृषि विभाग)
राज्याच्या कृषि विभागात विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंधानुसार कृषि संचालक, सहसंचालकासह अशा चार पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कृषि संचालक (कृषी अभियांत्रिकी, मालमत्ता व्यवस्थापन व ॲग्रीस्टॅक), कृषि सह संचालक (सांख्यिकी), कृषि सह संचालक (माहिती व तंत्रज्ञान) ही प्रतिनियुक्तीची २ पदे. अपर संचालक, ॲग्रीस्टॅक (महसूल) अशा पदांना मान्यता.

५. (सहकार व पणन विभाग)
लातूर जिल्ह्यातील किल्लारी (ता. औसा) येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून भांडवली खर्च व खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मंजुरी. कारखान्याचा १८ कोटी नऊ हजार रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगम पाठविण्यात येणार.

६. (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग)
स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याच्या नियमांमध्ये बदल. मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

७. (उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग)
वरीष्ठ महाविद्यालयांमध्ये समाजकार्य अशी स्वतंत्र विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी सुरु करता येणार. तसेच समाजकार्य महाविद्यालयांमध्येही कायम विनाअनुदान तत्वावर नवीन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी सुरू करता येणार.

८. (विधि व न्याय विभाग)
नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व सरकारी वकील कार्यालय होणार. यासाठी आवश्यक न्यायीक अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्या पदांना तसेच खर्चाच्या तरतुदीस मान्यता.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही