Share

गडचिरोली हादरलं! आश्रम शाळेत रात्री सर्पदंश; ३ विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील निवासी आश्रम शाळेत सर्पदंशामुळे ३ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून ३ विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Published On: 

Gadchiroli ashram school snakebite incident

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ‘जपतलाई निवासी आश्रम शाळेत’तून (Ashram School) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे साप चावल्यामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि तीन जणी जखमी झाल्या. मृत विद्यार्थिनींची नावे दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी अशी आहेत.

नेमके काय घडले?

विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना रात्री २:०० ते २:३० च्या दरम्यान घडली, जेव्हा विद्यार्थिनी जेवणानंतर झोपल्या होत्या. घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचार सुरू असताना दीपिका लकडा (इयत्ता ६ वी) आणि सुष्मिता मंडल (इयत्ता ८ वी) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अनु कोरेटी (इयत्ता २ री) हिचा गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Gadchiroli ashram school snakebite incident

इतर तीन विद्यार्थिनी दीपिका माडवी (इयत्ता ५ वी), कविता किरंगा (इयत्ता ६ वी) आणि समृद्धी नैताम (इयत्ता ८ वी) या तिघींवर सध्या गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी समृद्धी सुरेश नैताम हिची प्रकृती चिंताजनक आहे.

या घटनेमुळे त्यांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे. सर्पदंशाची ही घटना रात्री घडली. त्यानंतर वेळेत त्या मुलींना उपचार मिळाले का? हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही