Share

महाराष्ट्रात आणखी एका जिल्ह्याचे नामांतर? भाजप आमदाराचे CM फडणवीसांना पत्र

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यासाठी भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याची चर्चा राज्यात रंगली आहे.

Published On: 

Buldhana Rajmata Jijaunagar rename demand

मुंबई : महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांची नावे यापूर्वीच बदलण्यात आली आहेत. औरंगाबादचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आले, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ झाले आणि अहमदनगरचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात आले.

आता आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपच्या एका महिला आमदाराने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे.

भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ (Rajmata Jijaunagar) करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विनंतीची त्वरित दखल घेतली आणि प्रशासनाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊ-नगर’ करण्याची मागणी ही राजमाता जिजाऊ-साहेबांच्या जन्मस्थानाचा सन्मान करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असंख्य चाहत्यांच्या भावनांचा आदर करण्यासाठी करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

Buldhana Rajmata Jijaunagar rename demand

आमदार श्वेता महाले यांनी पत्रात म्हटले आहे की, “उपरोक्त विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की, देशोदेशीच्या पर्यटकांना भुरळ घालणारे जगप्रसिद्ध लोणार सरोवर, विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे व संत श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शेगाव, मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य, सैलानी बाबा दर्गा अशा अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांनी नटलेल्या बुलढाणा जिल्ह्यात जगभरातील पर्यटक पर्यटनासाठी येतात.”

बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, ही बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. राजमाता जिजाऊसाहेब यांनी बाल शिवबांच्या मनात हिंदवी स्वराज्य संस्थापनेचे बीजरोपण केल्यामुळे ७०० वर्षाच्या जुलमी राजवटीतून महाराष्ट्र व देश मुक्त झाला.

राजमाता जिजाऊसाहेब यांच्या या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून “राजमाता जिजाऊनगर” करण्यात यावे. जगभरातून येथे पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊसाहेब यांचे नाव जगभर पोहचेल.

अहिल्यानगरच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यास देशभरातील समस्त शिवप्रेमींना आनंदच होईल. समस्त शिवप्रेर्मीच्या भावनांचा आदर करून बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून “राजमाता जिजाऊनगर” करण्यात यावे, ही नम्र विनंती” असे म्हटले आहे.

हे पत्र श्वेता महाले यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, “राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि असंख्य शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी मी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.”

“मातृतीर्थ सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी आहे, ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बाल शिवबांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीज पेरून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवण्यात राजमाता जिजाऊसाहेबांचे योगदान अतुलनीय आहे,” असे कॅप्शन दिले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही