Share

सावजी वादावर तुकाराम मुंढे म्हणाले, ‘माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही’

Tukaram Mundhe यांनी सावजी जेवणावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना ते वैयक्तिक मत असल्याचे सांगितले आणि माफी मागण्यास नकार दिला.

Published On: 

tukaram mundhe fda saoji mutton action

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) प्रमुख तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) सध्या राज्यभर धडक कारवाई करत आहेत, ज्यामध्ये ‘ॲनालॉग पनीर’वर (कृत्रिम पनीर) बंदी घालण्याचाही समावेश आहे. आज एका पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ही बंदी एका वर्षासाठी लागू राहील. अमरावती येथील एका कार्यक्रमात नागपूरच्या (Nagpur) प्रसिद्ध ‘सावजी’ (Saoji) खाद्यपदार्थांबद्दल केलेल्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी ठाम भूमिका मांडली. मुंढे यांनी स्पष्ट केले की, “माझे वक्तव्य नीट ऐका, ते व्यक्तिगत होते. त्यामुळे, माझ्या वक्तव्यावर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.”

Tukaram Mundhe clarifies Saoji food

आरोग्याशी संबंधित एका कार्यक्रमात मुंडे यांनी टिप्पणी केली होती की, जर त्यांनी सावजी जेवण केले, तर त्यांना महिनाभर रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. या विधानाला नागपूरमधील सावजी रेस्टॉरंट चालकांकडून विरोध झाला आणि त्यांनी मुंढे यांना अस्सल सावजी पदार्थांची चव घेण्यासाठी आपल्या घरी आमंत्रित केले. तसेच, ‘सावजी’ हा केवळ एक खाद्यपदार्थ नसून ती एक सांस्कृतिक परंपरा आहे, असे म्हणत ‘हल्बा’ समाजातील उद्योजकांनी त्यांच्याकडे माफीची मागणी केली होती. आता मुंढे यांनी या मुद्द्यावरही भाष्य केले आहे.

माफी मागण्याचा प्रश्नच नाही

“माझे विधान पुन्हा एकदा ऐका. मी म्हणालो होतो की, *मी* ते खाल्ले तर महिनाभर आजारी पडेन, दुसरे आजारी पडतील असे म्हटलेलं नाही. कुणी खा किंवा नका खाऊ असे म्हटले नाही, असे स्पष्टीकरण तुकाराम मुंढेंनी दिले. “२००८-०९ मध्ये एका मित्राने मला सोबत नेले होते, ते पाहताच तो पदार्थ अतिशय लाल रंगाचा वाटला. मी फक्त एक घास घेतला आणि उठलो, कारण तो मला खूप तेलकट आणि तिखट वाटला. मात्र, मी कुणालाही खाऊ नये असे म्हटले नाही, असा किस्साही तुकाराम मुंढेंनी सांगितला. “माझे वक्तव्य वैयक्तिक होते, कोणी खावे आणि कोणी खाऊ नये याबद्दल मी काही म्हटले नाही. त्यामुळे, माझ्या वक्तव्यावर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.” असे म्हणत तुकाराम मुंढे यांनी माफी मागण्यास नकार दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही