Eknath Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारमधील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल (Cabinet Reshuffle) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून पूर्णपणे वगळले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या चार मंत्र्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचे समजते.
या चार मंत्र्यांची खाती बदलली जातील अशी चर्चा आहे. दरम्यान, केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)चे प्रमुख अभिजित दिपके (Abhijit Dipke) यांच्या घरी भेट दिल्याने मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे मंत्रिपद जाऊ शकते, असाही अंदाज लावला जात आहे.
Eknath Shinde Sanjay Shirsat cabinet reshuffle discussion
त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिपके यांच्या भेटीबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. शिरसाट यांच्या या भेटीमुळे भाजपमध्येही संताप होता. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या भेटीमुळे नाराज होते, असे समजते. सूत्रांच्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी दिपके यांच्याशी झालेल्या भेटीमुळे एकनाथ शिंदे हे संजय शिरसाट यांच्यावर अत्यंत नाराज होते.
शिरसाट यांची कृती अयोग्य
भाजपचे आमदार राम कदम यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. राजकारणात कोणीही कोणालाही भेटू शकते. मात्र, ज्या पद्धतीने दिपके यांनी तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जे विविध गैरप्रकार घडले, ते पाहता सत्ताधारी पक्षातील एका जबाबदार मंत्र्याने त्यांना भेटणे आणि त्याद्वारे अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणे अयोग्य होते.
शिरसाट आणि दिपके यांच्या भेटीची वेळ चुकीची होती. दिपके यांची पार्श्वभूमी योग्य नव्हती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली नाराजी समर्थनीय आहे. ही भेट व्हायला नको होती, असे मत भाजप नेत्यांनीही व्यक्त केले आहे. तरीही, शिरसाट यांचे मंत्रिपद जाईल या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही, असे राम कदम यांनी नमूद केले आणि संजय शिरसाट चांगले काम करत असल्याचेही सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- वयाच्या 74 व्या वर्षी प्रदीप रावत यांचे निधन; ‘महाभारत’पासून ‘गजनी’पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
- राज्यात SIR ला मुदतवाढ; मतदार नोंदणी आता १७ ऑगस्टपर्यंत, प्रारूप यादी २४ ऑगस्टला
- “कंगना रणौत यांनी RSS चे स्टार प्रचारक बनावे” : अजय राय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












