देशाच्या पंतप्रधानांना (PM Modi) भररस्त्यात शिव्या पडतात, आणि त्यावर ते थेट इन्स्टाग्रामवर येऊन ‘मुलांना माफ केलं’ असा व्हिडिओ टाकतात; पण हे सगळं आजची तरुण पिढी म्हणजे जेन झी (Gen Z) खरंच मनावर घेईल का? याच प्रश्नावरून आता राजकीय वर्तुळासोबतच मराठी सिनेसृष्टीतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जंतरमंतरवर शिवीगाळ करणाऱ्या आंदोलकांना माफ करत असल्याचा एक भावुक व्हिडिओ नुकताच शेअर केला होता. मात्र, मोदींच्या या व्हिडिओवर ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी जोरदार टीका केली आहे. माने यांनी सोशल मीडियावर एक सडेतोड पोस्ट शेअर करत थेट पंतप्रधानांना लक्ष केलंय, ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
Kiran Mane On PM Modi Video
“संसदेतून शेपूट घालून पळायचं आणि इन्स्टावर रील टाकून खोटा पुळका दाखवायचा,” अशा अत्यंत कडक शब्दांत किरण माने यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, पत्रकार परिषदांना घाबरायचं आणि इकडे मात्र स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान पाजळायचं. ‘जेनझी (Gen Z) इतनी नासमझ नही है दद्दू’, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.
दुसरीकडे, मोदींनी शुक्रवारी रात्री इन्स्टाग्रामवर आपला हा व्हिडिओ शेअर केला होता. यात त्यांनी जंतरमंतरवरील गदारोळाचा आणि आईला दिलेल्या शिव्यांचा उल्लेख केला. “कधी कधी दातांमध्ये जीभ चावली जाते, पण म्हणून आपण दात तोडत नाही,” असं मार्मिक उदाहरण त्यांनी दिलं होतं.
लहान मुलांकडून चुका होतात, त्यांना शिक्षा देण्यापेक्षा किंवा कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावण्यापेक्षा मार्ग दाखवणं गरजेचं असल्याचं सांगत, त्यांनी आंदोलकांना माफ केल्याचं जाहीर केलं होतं.
पंतप्रधानांच्या या भूमिकेचं एका बाजूला कौतुक होत असलं तरी, किरण मानेंसारख्या कलाकारांनी याला निव्वळ ‘स्क्रिप्टेड’ आणि पोकळ प्रकार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता या पोस्टवरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भाजपमध्ये अचानक मोठी उलथापालथ; आमदाराच्या राजीनाम्याने खळबळ
- एका धुरंधाराला पुरस्कार देण्यासाठी एक धुरंधर आले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ‘अमित भाई मोदींसोबत सावलीसारखे उभे होते’- एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












