बीड: मंत्र्यांच्या व्हीआयपी बैठकांमधून बाहेर आल्यावर अधिकारी थेट लोकांच्या कामाला लागतात असे तुम्हाला वाटत असेल, पण बीडमध्ये मात्र एक भलताच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीतून बाहेर पडलेला एक बडा अधिकारी थेट लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकलाय.
विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना तब्बल ४५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांच्याच घरी हा सापळा रचला होता. एका बाजूला मुंबईत नुकतंच ४० हजारांची लाच घेणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्याला पकडल्याची चर्चा होती. दुसरीकडे बीडमधील या ४५ लाखांच्या कारवाईने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळ हादरून गेलं आहे.
Beed ACB Raid: नियोजन समितीची बैठक ते ४५ लाखांची लाच
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सध्या दोन दिवसीय बीड दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जिल्हा नियोजन समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांनी अनेक सूचना केल्या. या बैठकीला वन अधिकारी लखमावाड हे देखील अगदी हजर होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियोजन समितीची ही बैठक संपल्यानंतर लखमावाड थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पण तिथे आधीच एसीबीचे अधिकारी पूर्ण तयारीत दबा धरून बसले होते. लखमावाड यांनी ४५ लाखांची मोठी रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना जागेवरच बेड्या ठोकल्या.
बीडमधील ही आतापर्यंतच्या मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे. सध्या याप्रकरणी एसीबीकडून अधिक सखोल चौकशी सुरू आहे. या धडक कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- 8th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट तिप्पट वाढ? १८ हजारांवरून ६९ हजारांच्या आकड्यामागचं गणित काय?
- मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; मंत्रालयाच्या कँटीनची अवस्था पाहून न्यायाधीश संतापले, नेमकं काय घडलं?
- राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार; पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












