Share

NEET आंदोलनाचे नवे नियम! CJP ने जाहीर केल्या ‘या’ चार अधिकृत घोषणा

दिल्लीतील जंतर-मंतरवरील NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान CJP ने आंदोलन शिस्तबद्ध ठेवण्यासाठी चार अधिकृत घोषणा जाहीर केले आहे.

Published On: 

NEET Protest Slogan

दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर (Jantar Mantar) येथे गेल्या एका महिन्यापासून ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या (पेपर लीक) मुद्द्यावरून तरुणांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व नव्याने स्थापन झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके करत आहेत. आंदोलनादरम्यान विविध प्रकारच्या घोषणा दिल्या जात असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर, CJP ने आता अधिकृतपणे चार विशिष्ट घोषणा जाहीर केल्या आहेत.

CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, आंदोलक विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि वाढता तणाव लक्षात घेता, आंदोलकांसाठी केवळ चार अधिकृत घोषणा निश्चित करण्यात आल्या आहेत. हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यामागचा उद्देश असा की, आंदोलनाची बदनामी करण्याच्या संधीच्या शोधात असलेल्या विरोधकांना तशी कोणतीही संधी मिळू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्या चार घोषणा अधिकृत असतील?

१. भारत माता की जय
२. इन्कलाब जिंदाबाद
३. जय भीम
४. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या

“इतर घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत”

आंदोलनाच्या ठिकाणी जमलेल्या हजारो तरुणांना संबोधित करताना आशुतोष रांका म्हणाले, “विरोधी गट केवळ एका चुकीच्या पावलाची वाट पाहत आहेत, जेणेकरून ते आपल्या आंदोलनाबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण करू शकतील. आपण त्यांच्या जाळ्यात अडकता कामा नये. म्हणूनच, आंदोलनादरम्यान या चार घोषणांशिवाय इतर कोणतीही घोषणा दिली जाऊ नये. जर कोणी आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणाऱ्या घोषणा देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्वरित थांबवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असेल.”

रांका यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना जंतरमंतर परिसराच्या मर्यादेतच राहण्याचे आवाहन केले आहे. “आम्हाला सामान्य नागरिकांना त्रास द्यायचा नाही. आपण शांततापूर्ण धरणे आंदोलन करत असल्यामुळेच सरकारवर आधीच दबाव निर्माण झाला आहे. या आंदोलनाचा एकच मुख्य उद्देश आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आम्ही या मागणीवर शेवटपर्यंत ठाम राहू,” असे त्यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही