भाजपची शरद पवार गटाला अट! आधी विलीनीकरण… मगच NDA?

शरद पवार गटाने एनडीएमध्ये सामील होण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे, अशी भाजपने अट घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published On: 

Sharad Pawar

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाने एनडीए (NDA) मध्ये सामील व्हावे, याबाबत सतत चर्चा आणि तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एनडीएमध्ये सामील होण्यापूर्वी एकत्र येण्याचे (विलीनीकरणाचे) निर्देश दिले आहेत. भाजपने (BJP) स्पष्ट केले आहे की, दोन्ही गटांनी आधी एक व्हावे आणि त्यानंतरच एनडीएमध्ये सामील व्हावे. तसेच, जर हे विलीनीकरण झाले, तर दोन्ही गटांना केंद्रात प्रत्येकी एक मंत्रिपद मिळू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन गटांच्या पुनर्एकत्रीकरणाबाबत जोरदार चर्चा झाली होती., मात्र नंतर ती चर्चा थंडावली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या एनडीए प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे. १४ जुलै रोजी राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. या भेटींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले.

तरीही, आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने शरद पवार गटाला एनडीएमध्ये सामील होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटात विलीन होण्यास सांगितले आहे. असेही समजते की, जर विलीनीकरण झाले तर दोन्ही गटांना केंद्रात प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल. त्यामुळे, विलीनीकरणाबाबत अखेरीस काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही