ठाकरेंचे ६ खासदार फुटल्यानंतर आता पवारांच्या गोटात काय शिजतंय? ‘ऑपरेशन तुतारी’बाबत मोठी बातमी

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या फूट पडणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंनाही खासदार फोडण्यात रस नसल्याने ‘ऑपरेशन तुतारी’ला ब्रेक लागला आहे.

Published On: 

Sharad Pawar NCP MPs - Sharad Pawar and Supriya Sule discussing political strategy.

पुणे – ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदेंनी गळाला लावल्यानंतर आता पुढचा नंबर शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादीचा आहे का? गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात या एकाच प्रश्नाने मोठी खळबळ उडवून दिली होती.

आगामी अधिवेशनात येणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या (डिलिमिटेशन बिल) निमित्ताने भाजपकडून आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यासाठीच पवारांचे खासदार फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण आता या सगळ्या राजकीय घडामोडींवर सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे.

Sharad Pawar | ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक, नेमकं काय घडलं?

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी शरद पवारांच्या पक्षात कोणतीही फूट पडण्याची शक्यता नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही आता पवारांचे खासदार फोडण्यात फारसा रस नसल्याचं समजतंय. त्यामुळे ‘ऑपरेशन तुतारी’ला तूर्तास ब्रेक लागला असून या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दुसरीकडे, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून (Delimitation Bill) महाविकास आघाडीतच काहीसा गोंधळ पाहायला मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की, जर या विधेयकात जागावाढीची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत ठेवली, तर त्यावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे.

सुळे यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच फोनाफोनी सुरू झाली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत तातडीने सारवासारव केली. राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असून, हे विधेयक आल्यावर आम्ही सर्वजण एकत्र बसूनच अंतिम निर्णय घेऊ, अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी मांडली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही