E20 इंधनावर नितीन गडकरींचे मोठे विधान; ‘१०० टक्के पेट्रोल हवे असेल तर जास्त पैसे मोजा’

इथेनॉल मिश्रित E20 इंधन सुरक्षित असून त्याबाबत एकही तक्रार आलेली नसल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १००% पेट्रोल वापरणाऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागेल, असे स्पष्ट केले.

Published On: 

Nitin Gadkari

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी १०० टक्के इथेनॉलच्या वापराला हिरवा कंदील दाखवला आणि केंद्र सरकारने त्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्देश जारी केला. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलसाठी (Diesel) भारत खाडी देशांवर अवलंबून आहे आणि इराण व अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

परिणामी, सरकारने इथेनॉलच्या (Ethenol) वापराबाबत मोठे निर्णय घेतले. मात्र, नितीन गडकरी यांच्या इथेनॉलच्या (E20 Fuel) आग्रहाला काही विरोधकांकडून (Opposition Party) तीव्र विरोध झाला. विशेषतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोघांनीही या मुद्द्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली. पेट्रोल आणि डिझेलसाठी भारताला करावा लागणारा वार्षिक खर्च किती आहे, याची विशिष्ट आकडेवारीही त्यांनी जाहीर केली. जागतिक बाजारपेठेत वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतींचा संदर्भ देत गडकरी यांनी सांगितले की, केंद्र सरकारच इथेनॉलचे दर निश्चित करेल.

या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरी यांनी इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्ट केले की, लोकांची इच्छा असल्यास ते १०० टक्के पेट्रोल भरू शकतात, मात्र त्यासाठी त्यांना अधिक किंमत मोजावी लागेल. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना गडकरी यांनी नमूद केले की, २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे (ब्लेंडिंग) उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य करण्यात आले आहे.

आता देशभरात E20 इंधन उपलब्ध आहे. जर लोकांना इथेनॉल-मिश्रित पेट्रोल नको असेल, तर ते १०० टक्के पेट्रोल भरू शकतात, पण त्यासाठी त्यांना जास्त किंमत मोजावी लागेल. E20 इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये कोणतीही समस्या येत नसल्याचा अहवाल आयआयटी (IIT) कानपूरने दिला आहे. तसेच, E20 वापरणाऱ्या वाहनांच्या मायलेजबाबतही कोणतीही अडचण आलेली नाही.

संशोधकांनी दुजोरा दिला की, E20 वर चालणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला नाही. गडकरी यांनी जनतेला आवाहन केले होते की E20-सुसंगत वाहनांबाबत काही समस्या आढळल्यास त्या कळवाव्यात, गडकरी यांनी सांगितले की अद्याप एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. नितीन गडकरी इथेनॉलच्या वापरासाठी आग्रही आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही