माझं आणि त्याचं नातं खूप आधीपासून..! रिंकू राजगुरूच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचं रहस्य अखेर उलगडलं!

रिंकू राजगुरूच्या वारीतील फोटोंमागचे रहस्य उलगडले असून, ‘बाप विठुराया’ या अजय गोगावले यांनी गायलेल्या पहिल्या अल्बम साँगधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Published On: 

Rinku Rajguru Baap Vithuraya look from new Marathi album song.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रिंकू राजगुरूचे (Rinku Rajguru) वारीतले काही फोटो अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘आर्ची’ अचानक वारीत काय करतेय आणि ती कोणता नवीन प्रोजेक्ट घेऊन येतेय, असा प्रश्न तुम्हालाही पडला होता ना?

अखेर या सर्व चर्चांवर आता पडदा पडला आहे. ‘सारेगम मराठी’ने नुकतंच रिंकूचं ‘बाप विठुराया’ (Baap Vithuraya) हे नवंकोरं गाणं प्रदर्शित केलं असून, यातून तिचा एक अस्सल मराठमोळा आणि वेगळाच अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे, रिंकूच्या अभिनय कारकिर्दीतलं हे पहिलंच अल्बम साँग आहे.

Rinku Rajguru Song

हे गाणं साध्यासुध्या आवाजात नाही, तर थेट अजय गोगावले यांच्या दमदार आणि जादुई आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. या पहिल्या अल्बमबद्दल बोलताना रिंकूने तिच्या भावना व्यक्त केल्या. माझं आणि विठ्ठलाचं नातं खूप जुनं असून, विठ्ठल माझ्या आयुष्यातला एक अत्यंत हळवा भाग असल्याचं ती म्हणाली.

“मी विठ्ठलावर खूप श्रद्धा ठेवते, त्याच्याशी गप्पा मारते. माझी कामाची पद्धत वेगळी असल्याने मी आजवर कधीच अल्बम साँग केलं नव्हतं. पण हे गाणं विठ्ठलावर असल्यानेच सगळं जुळून आलं,” अशी प्रतिक्रिया रिंकूने दिली.

त्यामुळेच ‘बाप विठुराया’ हा प्रोजेक्ट तिच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. कित्येक वर्षांनंतर अजय गोगावले यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याला आणि रिंकूच्या कधीही न पाहिलेल्या लूकला नेटकऱ्यांकडून जोरदार पसंती मिळत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही