🕒 1 min read
मुंबई : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे झालेल्या कार्यक्रमानंतर ज्योती वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राम आहेत आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लक्ष्मण आहेत. तसेच राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे संकेत दिले.
‘शिवसेनाच राज्यात मोठा पक्ष’
महायुतीमध्ये सध्या मोठा पक्ष कोण, यावर राजकीय चर्चा सुरू आहेत. शिवसेनेचे काही खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर या मुद्द्याला अधिक हवा मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्योती वाघमारे यांनी शिवसेना हा राज्यातील मोठा पक्ष असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील मोठ्या भावाच्या भूमिकेवरून सुरू असलेली चर्चा पुन्हा रंगली आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवरही निशाणा
ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवरही टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांची तुलना रावणाशी केली, तर संजय राऊत यांना कैकयीची उपमा दिली.
भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आणि भाजपकडून या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवप्रेमींसाठी गुडन्यूज! किल्ले रायगडावर सरकारी रोप-वेला मंजुरी
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ट्रक-कॉरच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू
- Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना येलो-ऑरेंज अलर्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












