Share

Ketan Agrawal Death Case: केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, सियाच्या हट्टामागे होता मोठा कट?

लोहगड मृत्यू प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. केतनला जायचं नव्हतं, मात्र सियाच्या आग्रहानंतर तो गेला, असा वडिलांचा दावा आहे.

Published On: 

Ketan Agrawal Death Case

🕒 1 min read

पुणे : पुण्यातील लोहगडावरील (lohagad fort) केतन अग्रवाल (Ketan Agrawal) मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून केतन दरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तपासात त्याला ढकलून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया (Siya) आणि तिचा कथित प्रियकर चौकशीच्या फेऱ्यात आहेत.

या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी केतन लोहगडावर गेला, त्या दिवशी त्याला तिथे जायची इच्छाच नव्हती. तो वारंवार लोहगडावर जाण्यास नकार देत होता. विशेष म्हणजे केतन हा नियमित ट्रेकर होता, त्यामुळे त्याचा अचानक आलेला नकार अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, लोहगडावर जाण्यास केतन तयार नव्हता. पण सियाने त्याच्या आईला फोन केला. तिने केतनला सोबत पाठवण्यासाठी त्याच्या आईची मदत घेतली. आईनं आपली सून सियाचा हट्ट पुरवला आणि केतन तिच्यासोबत जाण्यास तयार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ जूनला सियाचा वाढदिवस होता. त्याआधी प्री-बर्थडे सेलिब्रेशनसाठी (Pre-Birthday Celebration) लोहगडावर जाण्याचा प्लॅन करण्यात आला होता. १८ जून रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी केतन आणि सिया लोहगडासाठी रवाना झाले.

यानंतर सकाळी १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास लोहगडावर धक्कादायक घटना घडली. केतनच्या वडिलांच्या दाव्यानुसार, सिया आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी केतनवर हल्ला करून त्याला दरीत ढकलल्याचा संशय आहे. या घटनेत केतन सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, केतनला आधीच काही संशय आला होता का? लोहगडावर जाण्यास त्याने केलेला विरोध हा केवळ योगायोग होता की त्यामागे काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही