🕒 1 min read
परभणी : जिल्ह्यातील मानवत तालुक्यात शनिवारी (20 जून 2026) मोठी दुर्घटना घडली आहे. श्रीक्षेत्र यशवाडी (Yashwadi Temple) येथील निर्माणाधीन हनुमान मंदिराचे छत अचानक कोसळल्याने भक्तीस्थळी मृत्यूचा थरार पाहायला मिळाले. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शनिवार असल्याने मारुतीरायाच्या दर्शनासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या बांधकामाचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेनंतर मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग, आपत्कालीन पथके आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मंदिराचे बांधकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. मात्र, बांधकाम सुरू असतानाच छत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लग्नाचा गाजावाजा नाही! आमिर खान साधेपणात बांधणार लग्नगाठ
- गणपतीपुळे किनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरचे ५ तरुण समुद्रात बुडाले
- कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह! ओमराजे निंबाळकर म्हणाले, “हा निकाल दुर्दैवी”













