Share

“हे अत्यंत लज्जास्पद आहे”, शिल्पा शिंदेवर भडकली हिना खान, टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ

शिल्पा शिंदेने दहा वर्षांनंतर लैंगिक शोषणाचे आरोप खोटे असल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या लज्जास्पद कृत्यावरून हिना खानने तिच्यावर जोरदार टीका केली आहे.

Published On: 

Shilpa Shinde Fake Allegations - Hina Khan angry reaction.

🕒 1 min read

एखादी लढाई जिंकण्यासाठी एखाद्या निष्पाप व्यक्तीवर थेट लैंगिक शोषणाचे खोटे आरोप करणं कितपत योग्य आहे? एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकताच असा एक धक्कादायक खुलासा केलाय, ज्यामुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली आहे.

तब्बल दहा वर्षांपूर्वी ‘भाभीजी घर पर हैं’ (Bhabiji Ghar Par Hain) या मालिकेच्या सेटवर मोठा वाद झाला होता. त्यावेळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने (Shilpa Shinde) निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक शोषणाचे आणि मानसिक छळाचे अत्यंत गंभीर आरोप केले होते. पण आता भारती सिंहच्या पॉडकास्टवर खुद्द शिल्पानेच ते आरोप खोटे असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

Shilpa Shinde Fake Allegations

शिल्पाच्या या मोठ्या गौप्यस्फोटानंतर आता टीव्ही विश्वातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषतः ‘ये रिश्ता…’ फेम हिना खानने (Hina Kha)n इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शिल्पावर थेट हल्लाबोल केला आहे. “मी सहसा दुसऱ्यांच्या भानगडीत पडत नाही, पण इथे बोलणं गरजेचं आहे,” असं हिनाने ठणकावून सांगितलंय.

“ज्या व्यक्तीवर आरोप झाले तो एक कष्टकरी निर्माता आहे. त्याला स्वतःचं कुटुंब आहे आणि घरात इतर महिलाही आहेत. केवळ स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आणि लढाई जिंकण्यासाठी एखाद्याची अशी बदनामी करणं अत्यंत लज्जास्पद आहे,” अशा जळजळीत शब्दांत हिनाने आपला संताप व्यक्त केला.

अशा खोट्या आरोपांनंतरही संबंधित अभिनेत्रीला पुन्हा मालिकेत स्थान कसं मिळतं, असा सवालही तिने उपस्थित केला. खोट्या आरोपांमुळे कायद्याचा गैरवापर होतो आणि खऱ्या पीडित महिलांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, अशी भीती अभिनेत्री पूजा बेदीनेही व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, अभिनेता करण ओबेरॉयने या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. सूत्रांच्या मते, शिल्पाच्या या वक्तव्यामुळे आता कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. एका खोट्या आरोपामुळे दहा वर्षे एखाद्या व्यक्तीची झालेली बदनामी पाहता, आता नेमकं काय पाऊल उचललं जातं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!