🕒 1 min read
उन्हाच्या झळांनी हैराण झालेले तुम्ही पावसाची चातकासारखी वाट पाहत आहात का? जर हो, तर तुमच्यासाठी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण यंदा पाऊस दिलासा देण्याऐवजी आपलं रौद्र रूप दाखवणार असून मुंबईकरांसाठी हवामान विभागाने मोठा (IMD Weather Update) अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. पण याचदरम्यान, मुंबईसाठी एक अत्यंत गंभीर आणि धोक्याचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जून महिन्यात सलग ६ दिवस समुद्राला भयंकर उधाण येणार आहे.
IMD Weather Update
हवामान विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १४ जून ते १९ जून दरम्यान अरबी समुद्रात तब्बल ४.६५ ते ४.८७ मीटर उंचीच्या राक्षसी लाटा उसळणार आहेत. १४ जून रोजी सकाळी ११.२४ वाजता, १५ जूनला दुपारी १२.१४ वाजता, आणि १६ जूनला दुपारी १.०५ वाजता (सर्वाधिक ४.८७ मीटर) लाटांचा तडाखा पाहायला मिळेल.
त्याचप्रमाणे, १७ जूनला दुपारी १.५५, १८ जूनला दुपारी २.४४ आणि १९ जून रोजी दुपारी ३.३२ वाजता समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे या काळात मुंबईकरांनी कोणत्याही परिस्थितीत समुद्रकिनारी जाण्याचं धाडस करू नये, असं अत्यंत कडक आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दुसरीकडे, बळीराजासाठीही हवामानाची स्थिती फारशी अनुकूल नाही. यंदा मान्सूनवर ‘अल निनो’चं भयंकर सावट असल्याने पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची अजिबात घाई करू नये, असा स्पष्ट सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली, तरी खरीप हंगामातील पेरणीसाठी पुरेसा पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेणं गरजेचं आहे. केरळमध्ये मान्सून धडकताच त्याची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, तेव्हाच खऱ्या पावसाचा अंदाज येऊ शकेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- इंदोरीकर महाराजांच्या जावयाचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस थाटात; कुटुंबाचे खास फोटो पाहून नेटकरीही थक्क!
- ‘माझ्या आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार…’, थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर त्रिशाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
- अरे वा ! सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण; खरेदी करण्यापूर्वी आजचे नवे दर नक्की तपासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











