Share

शुबमन गिलने फायनलमधील पराभवानंतर मौन सोडलं, आरसीबीच्या विजयावर म्हणाला की…

आरसीबीकडून आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर शुबमन गिलने आपली खंत व्यक्त केली असून, सुरुवातीच्या विकेट्स पडल्यानेच लय बिघडल्याचा मोठा दावा केला आहे.

Published On: 

Shubman Gill IPL 2026 disappointed after losing final match to RCB

आयपीएल फायनलमध्ये आरसीबीच्या वादळापुढे गुजरात टायटन्सने नांगी का टाकली? हाच प्रश्न कालपासून क्रिकेट चाहत्यांना सतावत आहे. आयपीएल 2026 च्या महासंग्रामात सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकत आरसीबीने इतिहास रचला.

पण या मानहानीकारक पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने (Shubman Gill) असं काही म्हटलंय, ज्यामुळे सगळीकडेच चर्चांना उधाण आलं आहे. अंतिम सामन्यात गुजरातने दिलेलं 156 धावांचं माफक आव्हान आरसीबीने अगदी सहज, म्हणजे 18 व्या षटकातच पूर्ण केलं.

Shubman Gill IPL 2026 final 

नाणेफेकीपासून ते विजयाच्या क्षणापर्यंत आरसीबीनेच सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवलं. त्यामुळेच, सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्येच निम्मे धावा कुटत आरसीबीने गुजरातच्या पराभवाची स्क्रिप्ट फिक्स केली होती.

सामन्यानंतर बोलताना शुबमन गिलने थेट आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. तो म्हणाला, “जर आम्ही 180-190 धावांचा पल्ला गाठला असता, तर चित्र नक्कीच वेगळं असतं. सुरुवातीलाच दोन झटपट विकेट्स पडल्या आणि तिथेच आमची पूर्ण लय बिघडली.” दुसरीकडे, पॉवरप्लेमध्ये 15-20 धावा जास्त दिल्याची कबुलीही त्याने दिली.

स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी आमचीच होती, असा दावा करत गिलने आपल्या संघाची पाठ थोपटली. सुरुवातीचे सामने हरल्यानंतरही संघाने जोरदार कमबॅक केलं, याचा गिलला अभिमान आहे. जरी आम्ही ट्रॉफी जिंकली असती तरी सुधारणेला वाव होताच, असंही त्याने स्पष्ट केलं.

या विजयानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार भलताच भावूक झालेला पाहायला मिळाला. “आरसीबीचा कॅप्टन बनून ही चमचमती ट्रॉफी उचलेन, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. हे नशिबातच लिहिलं होतं,” असं पाटीदारने सांगितलं. नाणेफेक जिंकल्यामुळे टार्गेट चेस करणं सोपं गेल्याचंही त्याने नमूद केलं.

भुवी, हेझलवूड, रासिख आणि सुयश सारख्या गोलंदाजांनी संपूर्ण हंगामात जी कमाल केली, तीच या विजयाची खरी किल्ली ठरली, असंही पाटीदारने अभिमानाने सांगितलं. त्यामुळेच आता आरसीबी फॅन्सच्या आनंदाला उधाण आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install