Share

‘वीण दोघातली तुटेना’ मालिकेत स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न; चिंगीचा ‘तो’ रिपोर्ट पाहून मोठी खळबळ!

‘वीण दोघातली तुटेना’ मालिकेच्या नव्या प्रोमोत खळबळ उडाली आहे. चिंगी गरोदर असल्याचं समजताच स्वानंदी भर मांडवात जाऊन अंशुमनचं लग्न मोडताना दिसत आहे.

Published On: 

Veen Doghatli Tutena episode Swanandi stops Anshuman wedding with Chingi report

🕒 1 min read

एखाद्याच्या लग्नात अचानक एखादी मुलगी गरोदर असल्याचा रिपोर्ट घेऊन आली, तर काय होईल? झी मराठीवरील ‘वीण दोघातली तुटेना’ (Veen Doghatli Tutena) मालिकेत असाच एक भन्नाट आणि अंगावर काटा आणणारा प्रसंग लवकरच पाहायला मिळणार आहे.

एकीकडे स्वानंदीच्या (Swanandi) आयुष्यात समरच्या रूपाने प्रेमाचे वारे वाहत आहेत, तर दुसरीकडे अंशुमनच्या लग्नाची (Anshuman wedding) जोरदार तयारी सुरू होती. पण याचदरम्यान स्वानंदीच्या हाती चिंगीचा प्रेग्नेंसी रिपोर्ट लागतो आणि या शांत कथानकाला एक मोठा धक्कादायक ट्विस्ट मिळतो.

Veen Doghatli Tutena Episode 

झी मराठीने नुकताच या नव्या भागाचा प्रोमो शेअर केला असून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. चिंगीला प्रेमाची खोटी वचनं देऊन अंशुमन अगदी निवांतपणे दुसऱ्याच मुलीशी बोहल्यावर चढणार होता, पण आता त्याचे मनसुबे उधळले जाणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि व्हायरल प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे, स्वानंदीला जेव्हा चिंगी गरोदर असल्याचं समजतं, तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. ती थेट चिंगीला जाब विचारते, ज्यावर चिंगी रडत “मला काहीच कळत नाहीये” असं हतबल होऊन सांगते.

त्यामुळेच स्वानंदीचा संताप अनावर होतो. तिकडे अंशुमनच्या गळ्यात हार पडणार इतक्यात स्वानंदी चिंगीचा हात धरून थेट भर मांडवात एन्ट्री घेते. “हे लग्न होऊ शकत नाही, कारण तुमच्या मुलाने या घराची लाज घालवलीय,” असा मोठा गौप्यस्फोट करत ती राजवाडे कुटुंबासमोर अंशुमनचे बिंग फोडते.

या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे. सोशल मीडियावर चाहते ‘आता मालिका पाहण्यात खरी मजा येईल’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. दुसरीकडे, अनेकांनी ‘मालिकेत अधिरा खूप दिवसांपासून का दिसत नाही?’ असा सवालही विचारलाय. आता स्वानंदी अंशुमनची कशी बँड वाजवणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!