Share

विराट कोहलीने मैदानातच गुजरातच्या खेळाडूंना डिवचलं; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून उडाली खळबळ!

आरसीबीने गुजरातचा पराभव करत आयपीएल फायनल गाठली आहे. मात्र सामन्यापूर्वी विराटने गुजरातच्या खेळाडूंना डिवचल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published On: 

Virat Kohli Viral Video teasing Gujarat Titans players during IPL match

विराट कोहली मैदानात असला की काहीतरी भन्नाट घडणार नाही, असं कधीच होत नाही. आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडलंय, ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार खळबळ उडाली आहे.

आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा तब्बल ९२ धावांनी धुव्वा उडवत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठत आरसीबीने जेतेपदावर मजबूत दावा सांगितलाय. पण या दणदणीत विजयापेक्षा सध्या चर्चा रंगलीय ती सामन्यापूर्वीच्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका सीक्रेट व्हिडीओची.

Virat Kohli Viral Video

धर्मशाला इथल्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा हाय-व्होल्टेज सामना खेळवला गेला. नाणेफेक जिंकून गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीची फलंदाजी येणार म्हणून सामना सुरू होण्यापूर्वी गुजरातच्या टीमचा मैदानावर एक फोटोशूट सुरू होता.

नेमक्या याच वेळी विराट फलंदाजीसाठी पॅड बांधून सीमारेषेवर उभा होता. समोर गुजरातच्या खेळाडूंना पाहिल्यानंतर विराटने काही विचित्र इशारे करून त्यांना डिवचायला सुरुवात केली. तो हसत होता आणि समोरच्यांना चिडवत होता, हे या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय.

विराट नेमकं कोणाला चिडवत होता, हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. पण गुजरातच्या गोटात इशांत शर्मा, आशिष नेहरा आणि कर्णधार शुभमन गिल असे विराटचे एकदम खास मित्र आहेत. त्यामुळे तो नक्कीच यापैकी कोणाची तरी फिरकी घेत असावा, अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

सर्वांत रंजक गोष्ट म्हणजे, विराटची ही मस्ती त्याचा जुना सहकारी तरूवर कोहली याने कॅमेऱ्यात कैद केली. अंडर-१९ मध्ये हे दोघे एकत्र खेळले होते. तरूवर हा सामना पाहण्यासाठी खास स्टेडियममध्ये आला होता. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि बघता बघता तो तुफान व्हायरल झाला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install