हार्दिक पांड्या अंबानींना सोडणार? ‘चेन्नई’मध्ये एन्ट्रीच्या चर्चांनी आयपीएलमध्ये उडाली मोठी खळबळ!

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या अंबानींची साथ सोडून लवकरच चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील होऊ शकतो, अशा चर्चांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Published On: 

Hardik Pandya to CSK: मुंबईला सोडचिठ्ठी?

आयपीएलच्या (IPL) मैदानात कधी कोणता संघ कोणता डाव टाकेल, याचा काहीही नेम नसतो. पण यावेळी थेट मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोटातूनच एक असा भूकंप समोर येतोय, ज्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) लवकरच नीता अंबानींची साथ सोडून चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या ताफ्यात सामील होणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. सध्या ‘Hardik Pandya to CSK’ हा ट्रेंड इंटरनेटवर चांगलाच तापला आहे.

Hardik Pandya to CSK

नुकत्याच चेन्नईविरुद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबईच्या संघ व्यवस्थापनात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघात कुणी फारशी साथ देत नसल्याने खुद्द हार्दिकनेच ‘चेन्नई’ची पिवळी जर्सी घालण्यास पसंती दर्शवली असल्याचा दावा केला जातोय.

आता हा व्यवहार होणार कसा? तर, यासाठी दोन मोठे पर्याय समोर आले आहेत. पहिला म्हणजे ऑल-कॅश डील (All-Cash Deal), ज्यामध्ये रोख रकमेच्या बदल्यात हार्दिकला रिलीज केले जाईल. आणि दुसरा पर्याय म्हणजे प्लेअर ट्रेड (Player Trade), ज्यात दोन संघांमध्ये खेळाडूंची अदलाबदल होईल.

अर्थात, या सगळ्या केवळ सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट्स आणि चर्चा आहेत. अद्याप मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स किंवा स्वतः हार्दिक पांड्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे खरंच हार्दिक धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार का, हे पाहण्यासाठी चाहत्यांना अधिकृत माहितीची वाट पाहावी लागणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही