IND vs NZ Final : बुमराहची धास्ती अन् न्यूझीलंडची प्रार्थना; फायनलआधीच ग्लेन फिलिप्सचा मोठा खुलासा!

T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये जसप्रीत बुमराहचा दिवस खराब असावा, अशी प्रार्थना न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सने केली आहे.

Published On: 

Jasprit Bumrah in T20 WC Final: फिलिप्सची मोठी प्रतिक्रिया!

क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल याचा नेम नसतो, पण जेव्हा समोर जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज असतो, तेव्हा भल्याभल्या फलंदाजांना घाम फुटतो. याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय.

येत्या रविवारी (८ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर T20 World Cup 2026 चा महाअंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या हाय-व्होल्टेज सामन्याआधीच किवी गोटात बुमराहचं (Jasprit Bumrah) मोठं टेन्शन पाहायला मिळत आहे.

Jasprit Bumrah in T20 WC Final

शुक्रवारी (६ मार्च) अहमदाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन फिलिप्सने एक मोठं वक्तव्य केलं. “बुमराह एक जबरदस्त गोलंदाज आहे, पण तोही शेवटी एक माणूसच आहे. त्याचाही एखादा दिवस खराब असू शकतो आणि रविवारी तोच खराब दिवस असावा, अशी आमची प्रार्थना आहे,” असा मोठा खुलासा फिलिप्सने केला.

भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे आणि या यशात बुमराहचा वाटा सिंहाचा आहे. मुंबईत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये धावांचा पाऊस पडला. तब्बल ४९९ धावांच्या त्या सामन्यातही बुमराहने ४ षटकांत फक्त ३३ धावा देत १ बळी घेतला. बुमराहच्या याच अचूक यॉर्कर आणि स्लोअर बॉलने इंग्लंडचा गेम केला होता.

याच पार्श्वभूमीवर बोलताना फिलिप्सने न्यूझीलंडची रणनीती स्पष्ट केली. इंग्लंडने डेथ ओव्हर्समध्ये बुमराहला फक्त खेळून काढण्याची आणि इतरांना टार्गेट करण्याची चूक केली. पण न्यूझीलंड तसं करणार नाही. बुमराहकडून एखादी चूक झाली तर आम्ही त्यावर नक्कीच हल्ला चढवू, असा थेट इशाराही त्याने दिला आहे. आता फायनलच्या महासंग्रामात बुमराह न्यूझीलंडला भारी पडणार की फिलिप्सची प्रार्थना कामी येणार? हे पाहणं रंजक ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही