Share

Ind vs SA T20 World Cup : सूर्यकुमार यादवने कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर? जाहीरपणे नाव घेत म्हणाला…

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात झालेल्या ७६ धावांच्या पराभवानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने फलंदाजांच्या सुमार कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Published On: 

Ind vs SA T20 World Cup: सूर्याने कोणावर फोडलं खापर?

क्रिकेटमध्ये कधी फासे पलटतील सांगता येत नाही, आणि याचाच मोठा फटका आता टीम इंडियाला बसलाय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या Ind vs SA T20 World Cup च्या सुपर-८ सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल ७६ धावांनी मानहानीकारक पराभव झाला.

या पराभवानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चांगलाच खचलेला दिसला. पण सामन्यानंतर त्याने पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Suryakumar Yadav On Ind vs SA

आफ्रिकेची अवस्था सुरुवातीला २० धावांवर ३ बाद अशी बिकट होती. पण त्यांनी जबरदस्त कमबॅक करत १८७ धावांचा डोंगर उभा केला. या डोंगराखाली भारतीय फलंदाज असे काही दबले की संपूर्ण संघ अवघ्या १११ धावांवर गारद झाला.

सामन्यानंतर बोलताना सूर्याने स्पष्टच सांगितलं की, गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं, पण फलंदाजांनी मात्र घोर निराशा केली. तो म्हणाला, “जर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असती, तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता.”

सूर्याने थेट पॉवरप्लेमधील खराब कामगिरीवर बोट ठेवलं. “१८५ धावांचा पाठलाग करताना तुम्ही पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, पण तिथेच तुम्ही तो नक्की हरू शकता,” अशी रोखठोक प्रतिक्रिया त्याने दिली. सुरुवातीलाच विकेट्स गेल्याने संघाला सावरताच आलं नाही, आणि छोट्या भागीदाऱ्याही करता आल्या नाहीत, अशी खंत त्याने बोलून दाखवली.

जसप्रीत बुमराह (१५ धावांत ३ बळी) आणि अर्शदीप सिंगच्या (२ बळी) घातक गोलंदाजीचं सूर्याने भरभरून कौतुक केलं. या पराभवातून धडा घेत, आता २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या ‘करो या मरो’ सामन्यात संघ नव्या ताकदीने आणि दमदार रणनीतीने मैदानात उतरेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install