ईशानचं वादळी शतक अन् अर्शदीपचा ‘पंजा’; भारताने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत वर्ल्डकपचे रणशिंग फुंकले!

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या 5व्या टी-20 सामन्यात 46 धावांनी विजय मिळवला. ईशान किशनच्या शतकामुळे भारताने 4-1 ने मालिका खिशात घातली.

Published On: 

IND vs NZ 5th T20: ईशान किशनचे वादळी शतक; भारताने मालिका जिंकली!

“आता वर्ल्डकप कुणाचा?” असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर टीम इंडियाने कालच्या कामगिरीने त्याचं रोखठोक उत्तर दिलंय! तिरुअनंतपुरात धावांचा पाऊस आणि विक्रमांची आतषबाजी पाहायला मिळाली. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने पाहुण्यांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे.

पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. अखेरच्या सामन्यात भारताने 46 धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-20 वर्ल्डकपसाठी आपण सज्ज असल्याचा धोक्याचा इशाराच प्रतिस्पर्ध्यांना दिला आहे.

IND vs NZ 5th T20

सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला तो युवा ईशान किशन! संजू सॅमसन पुन्हा एकदा अवघ्या 6 धावांवर बाद झाल्याने निराशा झाली, पण त्यानंतर ईशानने जी फटकेबाजी केली, ती पाहण्यासारखी होती. अवघ्या 43 चेंडूत 103 धावा कुटत ईशानने कारकिर्दीतील पहिलं आंतरराष्ट्रीय टी-20 शतक साजरं केलं. त्याने आपल्या इनिंगमध्ये तब्बल 10 षटकार लगावले.

ईशानला साथ मिळाली ती कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याची. सूर्याने नेहमीच्या शैलीत 30 चेंडूत 63 धावा चोपल्या, तर हार्दिकने शेवटच्या काही षटकांत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. हार्दिकच्या 17 चेंडूतील 47 धावांमुळे भारताने 271 धावांचा भल्यामोठा डोंगर उभा केला.

इतक्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली झुंज दिली. फिन ॲलनने 30 चेंडूत 80 धावांची झंझावाती खेळी केली, ज्यामुळे भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, वेळेवर गोलंदाजांनी कमबॅक केलं. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यात ‘पंजा’ खोलत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले.

अखेरीस न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 225 धावांवर गुंडाळला गेला. भारताने ही मालिका जिंकून वर्ल्डकपसाठी आपला ‘होमवर्क’ पूर्ण केला आहे, असंच म्हणावं लागेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही