🕒 1 min read
वर्ल्डकपच्या रणसंग्रामाला सुरुवात होण्याआधी टीम इंडियासाठी आजची मॅच म्हणजे ‘काटे की टक्कर’ नसली तरी ‘लिटमस टेस्ट’ नक्कीच आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारताने आधीच खिशात घातली आहे, पण विशाखापट्टणमच्या पराभवानंतर टीम इंडिया सावध झाली आहे. आज तिरुवनंतपुरममध्ये होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
सर्वात मोठी चर्चा आहे ती फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) बद्दल. हा सामना संजूच्या घरच्या मैदानावर होत असला, तरी त्याचा खराब फॉर्म त्याच्यासाठी धोक्याची घंटा ठरला आहे. या मालिकेत संजूला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. तांत्रिक चुका आणि ढासळलेला आत्मविश्वास यामुळे त्याला आजच्या सामन्यात कट केलं जाण्याची दाट शक्यता आहे.
IND vs NZ 5th T20 Playing XI
संजूच्या जागी फॉर्मात असलेल्या ईशान किशनला (Ishan Kishan) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. ईशानने या मालिकेत शानदार कामगिरी केली होती, पण दुखापतीमुळे त्याला मागच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. आता तो पूर्णपणे फिट असून ओपनिंग किंवा मिडची जबाबदारी सांभाळू शकतो.
दुसरीकडे, गोलंदाजीतही बदल अपेक्षित आहेत. मागील दोन सामने बाकावर बसलेल्या मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला पुन्हा संधी मिळू शकते. तसेच, उपकर्णधार अक्षर पटेल दुखापतीतून सावरत असून त्याने नेटमध्ये सराव केला आहे. मात्र, ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपचा विचार करता, मॅनेजमेंट त्याला खेळवून रिस्क घेणार की विश्रांती देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मालिका ४-१ ने जिंकून वर्ल्डकपला सामोरं जाण्याचा टीम इंडियाचा पूर्ण प्रयत्न असेल.
भारताची संभाव्य Playing XI : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल/रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत-पाकिस्तान सामन्याआधी ICC ची मोठी खेळी; ‘या’ दोघांच्या हातात असणार हाय-व्होल्टेज सामन्याची सूत्रं!
- Ind vs NZ : मॅचपूर्वी टीम इंडिया पोहोचली ‘या’ रहस्यमयी मंदिरात; सूर्या-रिंकूच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष!
- फिल्म इंडस्ट्री हादरली! मोहनलालच्या निर्मात्यानं स्वतःवर झाडली गोळी; ‘त्या’ रेडनंतर उचललं टोकाचं पाऊल?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












