मैदानावर आपल्या बॅटिंगने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारे भारतीय खेळाडू अचानक शांत आणि सात्विक रूपात दिसले तर? असंच काहीसं चित्र सध्या तिरुवनंतपुरममध्ये पाहायला मिळालं आहे. भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यातील थरारक टी-20 मालिकेच्या अखेरच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने चक्क ‘स्पिरिचुअल ब्रेक’ घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना आज, ३१ जानेवारीला (शनिवार) तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह (Suryakumar Yadav) अनेक खेळाडूंनी प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात (Sree Padmanabhaswamy Temple) जाऊन माथा टेकवला. विशेष म्हणजे, नेहमी जर्सीमध्ये दिसणारे हे खेळाडू यावेळी पूर्णपणे पारंपरिक वेशभूषेत होते.
Ind vs NZ 5th T20
सोशल मीडियावर या दर्शनाचा एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव, सिक्सर किंग रिंकू सिंग, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवी बिष्णोई आणि अक्षर पटेल हे खेळाडू भक्तीभावाने दर्शन घेताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत फिल्डिंग कोच टी. दिलीप देखील उपस्थित होते. अंगावर वस्त्र आणि खाली पारंपरिक मुंडू (लुंगी) अशा वेशात खेळाडूंना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
नागपूर, रायपूर आणि गुवाहाटी येथील सामने जिंकून भारताने मालिका आधीच खिशात घातली आहे. मात्र, विशाखापट्टणममध्ये झालेल्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ५० धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका ४-१ ने खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
वन-डे मालिकेत न्यूझीलंडने भारताला २-१ ने हरवलं होतं, त्याचा वचपा काढण्याची आणि आगामी टी-20 वर्ल्डकपपूर्वी विजयाने निरोप घेण्याची ही मोठी संधी सुर्याच्या सेनेकडे आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- फिल्म इंडस्ट्री हादरली! मोहनलालच्या निर्मात्यानं स्वतःवर झाडली गोळी; ‘त्या’ रेडनंतर उचललं टोकाचं पाऊल?
- ‘लग्नाआधी शारीरिक संबंध…’; दीपिकाच्या ‘त्या’ एका वक्तव्याने बॉलीवूडमध्ये उडाली होती खळबळ!
- ‘मला राजकारण कळतं, पण…’; रितेश देशमुख राजकारणात येणार का? रितेशचा मोठा खुलासा!
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








