Share

“मला आयुष्यभर तो पश्चाताप राहील…”; अजितदादांच्या आठवणीत ऑलिंपिक विजेती पीव्ही सिंधू गहिवरली!

अजित पवारांच्या अचानक जाण्याने पीव्ही सिंधूला एका गोष्टीचा मोठा पश्चाताप होतोय. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Published On: 

PV Sindhu Reaction: अजित पवारांच्या निधनावर सिंधू भावूक, म्हणाली...

🕒 1 min read

काळाचा घाला कोणावर आणि कधी येईल हे सांगता येत नाही, याचा चटका लावणारा आणि सुन्न करणारा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने घेतला. राजकारणातील डॅशिंग नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar Death) अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वचजण शोकाकुल असताना, भारताची ऑलिंपिक विजेती पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) हिने व्यक्त केलेल्या भावना वाचून कोणाचेही डोळे पाणावतील.

अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच पी.व्ही. सिंधूने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. दादांच्या भेटीगाठी, त्यांची शिस्त आणि कार्यपद्धती आठवताना सिंधूने एका गोष्टीची मोठी खंत व्यक्त केली. ती म्हणाली, “दादा, तुम्ही मला नेहमी प्रेमाने म्हणायचात की, माझ्या बारामतीला नक्की ये. मला नेहमी वाटायचं की खूप वेळ आहे, आपण कधीतरी निवांत जाऊ. पण नियतीला हे मान्य नव्हतं.”

PV Sindhu Reaction

ती पुढे म्हणाली, “आज मला बारामतीला न जाता आल्याचा जो पश्चात्ताप होतोय, त्याची मी कल्पनाही केली नव्हती. अशी वेळ येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.” सिंधूच्या या शब्दांनी सोशल मीडियावर अनेकांचे मन हेलावून टाकले आहे.

केवळ अजितदादाच नाही, तर या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेले कॅप्टन शांभवी पाठक, सुमित कपूर आणि इतर सहकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या दु:खातही सिंधू सहभागी झाली आहे. “या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वर सर्वांना देवो,” अशी प्रार्थना तिने केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांशी फोनवरून चर्चा करत सांत्वन केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी “महाराष्ट्र एका कर्तृत्वान नेतृत्वाला मुकला,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही