किंग कोहलीच्या टीमसाठी आदर पूनावाला मैदानात; खरेदीसाठी लावली ‘इतकी’ मोठी बोली?

आरसीबीच्या मालकी हक्कासाठी पुण्याचे आदर पूनावाला मैदानात उतरले आहेत. त्यांनी ‘मजबूत बोली’ लावण्याची घोषणा केल्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

Adar Poonawalla RCB News: आदर पूनावाला खरेदी करणार कोहलीची टीम? ट्विटने खळबळ!

आयपीएलच्या मैदानात ‘ई साला कप नामदे’चा नारा देणाऱ्या आरसीबी फॅन्ससाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ची मालकी आता बदलणार का? या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत. कारण, पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी आता थेट क्रिकेटच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.

Adar Poonawalla RCB News

गेल्या काही महिन्यांपासून आरसीबीच्या विक्रीची जोरदार चर्चा सुरू होती, पण आता पहिल्यांदाच एका बड्या उद्योगपतीने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. २२ जानेवारीला आदर पूनावाला यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट टाकून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलंय, “मी येत्या काही महिन्यांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी एक मजबूत आणि स्पर्धात्मक बोली लावण्याची तयारी करत आहे.” पूनावाला यांनी या व्यवहारासाठी एक COMPETITIVE Bid For RCB सादर करण्याची इच्छा व्यक्त केल्याने, हा व्यवहार किती हजार कोटींच्या घरात जाणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

आरसीबीची सध्याची मालक कंपनी ‘डियाजिओ’ने (Diageo) ३१ मार्च २०२६ पर्यंत ही विक्री प्रक्रिया पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. विशेष म्हणजे, तब्बल १७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीने गेल्या मोसमात आपलं पहिलं आयपीएल विजेतेपद पटकावलं होतं. या विजयानंतर टीमची ब्रँड व्हॅल्यू शिखरावर आहे. नेमकं हेच टायमिंग साधत डियाजिओने टीम विकून नफा कमावण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी या प्रक्रियेला ‘स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू’ असं गोंडस नाव दिलं असलं, तरी आरसीबीचा लिलाव होणार हे आता जवळपास नक्की झालंय.

दुसरीकडे, ललित मोदीने सप्टेंबरमध्येच याबाबतचा गौप्यस्फोट केला होता. “आरसीबीचे मालक टीम विकण्याच्या तयारीत आहेत आणि यासाठी अनेक ऑफर्स येत आहेत,” असं मोदीने इन्स्टाग्रामवर म्हटलं होतं. आता पूनावालांच्या एन्ट्रीमुळे त्या दाव्यात तथ्य असल्याचं सिद्ध झालंय. सुमारे २२.१ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या पूनावाला कुटुंबाने यात रस दाखवल्यामुळे आरसीबी आता पुण्याच्या मालकीची होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही