Share

‘म्हातारे स्टार्स टिकवण्यासाठीच तो नियम…’, रिकी पॉन्टिंगने BBL च्या निर्णयावर थेट बोट ठेवलं!

BBL च्या नवीन नियमावर रिकी पॉन्टिंगने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. हा नियम ‘म्हातारे स्टार्स’ टिकवून ठेवण्यासाठी असल्याचा दावा त्याने केलाय.

Published On: 

Ricky Ponting on BBL Rule

ऑस्ट्रेलिया – क्रिकेटच्या मैदानात आता फक्त चौकार-षटकारांची आतिषबाजी नाही, तर नियमांचीही नवी खेळी सुरू झालीये. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगने (BBL) आगामी १६ व्या हंगामासाठी एक असा नियम आणलाय, ज्याची सध्या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा आहे. हा नियम म्हणजे ‘डेझिग्नेटेड बॅटर’ (Designated Batter). पण हा नियम नक्की कोणासाठी आणि का आणला गेला? यावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याने जे उत्तर दिलंय, ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बिग बॅश लीगच्या नवीन नियमानुसार, आता टीमला एका अशा खेळाडूची निवड करता येईल जो फक्त बॅटिंग करेल. त्याला बॉलिंग करता येणार नाही, पण तो विकेटकीपिंग करू शकतो. विशेष म्हणजे, जेव्हा त्याची बॅटिंग नसेल, तेव्हा त्याच्या जागी दुसरा खेळाडू फक्त फिल्डिंगसाठी मैदानात उतरू शकेल. थोडक्यात काय, तर ‘फक्त बॅटिंग करा आणि डगआऊटमध्ये जाऊन आरामात बसा.’

Ricky Ponting on BBL Rule

या नव्या नियमावर बोलताना रिकी पॉन्टिंगने रोखठोक मत मांडलं. तो म्हणाला, हा नियम मुख्यत्वे अशासाठी आणलाय जेणेकरून लीगमध्ये असलेले “वाढत्या वयाचे स्टार्स (Ageing Stars)” अजून काही काळ टिकून राहतील. पॉन्टिंगच्या मते, “ख्रिस लिन आणि मिचेल मार्शसारख्या खेळाडूंना याचा फायदा होईल. जेणेकरून त्यांना फिल्डिंगचं ओझं वाहावं लागणार नाही.”

पॉन्टिंगने ट्रॅव्हिस हेडचं उदाहरण देत आणखी एक मुद्दा मांडला. तो म्हणाला की, आंतरराष्ट्रीय सामने खेळून दमलेले मोठे खेळाडू दुखापतीच्या भीतीने लीग खेळायला टाळाटाळ करतात. पण आता फक्त बॅटिंगचा पर्याय असल्याने ट्रॅव्हिस हेड (Travis Head) सारखे खेळाडूही आनंदाने खेळायला तयार होतील.

दुसरीकडे, पॉन्टिंगच्या शेजारीच उभ्या असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) मात्र याचं स्वागत केलंय. त्याच्या मते, यामुळे तरुण खेळाडूंना मोठ्या स्टार्ससोबत फिल्डिंग करण्याची सुवर्णसंधी मिळेल, जे त्यांच्यासाठी मोठं मोटिव्हेशन ठरेल. हा नियम फक्त पुरुषांच्या स्पर्धेसाठी असून महिलांच्या WBBL मध्ये लागू होणार नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install