बाळासाहेबांच्या सभेला झाडावर लटकणारी गर्दी ते शिंदेंच्या सभेला ‘नाव न माहित’ असलेले लोक; शिवतीर्थाने काय काय पाहिलं!

मराठी अस्मितेचे केंद्र असलेल्या शिवाजी पार्कवर बंगाली आणि हिंदी भाषिक मजुरांची गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न फडणवीस-शिंदेंच्या अंगलट.

Published On: 

Balasaheb Thackeray vs Eknath Shinde, Shivaji Park

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा म्हटलं की, शिवाजी पार्कवर पाय ठेवायला जागा नसायची. लोक स्वतःचे डबे घेऊन यायचे, झाडावर चढून भाषणं ऐकायचे. पण आज याच शिवतीर्थावर झालेल्या महायुतीच्या सभेत, “कशाची मिटिंग आहे माहित नाही” असं म्हणणारी गर्दी पाहून तमाम शिवसैनिकांचे मन खिन्न झाले असेल. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सभेला परप्रांतीय माणसं आणण्याची वेळ का आली? हा व्हिडिओ पाहिल्यावर समजेल.

Balasaheb Thackeray vs Eknath Shinde Shivaji Park History

बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबई ठप्प व्हायची. पण कालच्या सभेत आलेल्या लोकांना राज्याच्या उप-मुख्यमंत्र्यांचे नावही नीट घेता येत नव्हते. एका समर्थकाने शिंदेंचा उल्लेख चक्क “शिराज सिंग” असा केला. तर काहींनी ही “शिवाजीची मिटिंग” असल्याचा जावईशोध लावला. ज्यांना नेता माहित नाही, पक्ष माहित नाही, आणि भाषाही (मराठी) येत नाही, अशा लोकांच्या भरवशावर शिंदे गट मुंबई जिंकणार का?

शिवतीर्थाचे पावित्र्य भंग?

मराठी अस्मितेचे केंद्र असलेल्या शिवाजी पार्कवर बंगाली आणि हिंदी भाषिक मजुरांची गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न अंगलट आल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, हे लोक हे केवळ ‘हजेरी’ लावण्यासाठी आले होते. त्यामुळे खुर्च्या भरल्या असतील, पण मने जिंकली का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही