🕒 1 min read
पुणे – राजकारणात सत्तेच्या जोड्या कशा असतात आणि स्थानिक पातळीवर त्या कशा बदलतात, याचा एक जबरदस्त नमुना सध्या पुणेकर अनुभवत आहेत. पुण्यात ‘संवाद पुणेकरांशी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) अतिशय मार्मिक आणि सूचक शब्दांत निशाणा साधला आहे. अभिनेत्री गिरीजा ओक हिने घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी थेट अजितदादांच्या ‘संयमा’वरच बोट ठेवलं.
“१५ तारखेनंतर दादा बोलणार नाहीत”
अजित पवारांच्या आक्रमक प्रचारावर बोलताना फडणवीस म्हणाले, “मी आतापर्यंत संयम पाळलाय, पण त्यांचा संयम थोडा ढळलाय. कदाचित निवडणुकीतील स्थिती पाहून दादांचा संयम कमी झालेला वाटतोय.” इतकंच नाही तर, “ते १५ तारखेनंतर बोलणार नाहीत,” असा खळबळजनक दावाही फडणवीसांनी केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pune & PCMC) दोन्ही पक्ष भक्कम असल्याने एकत्र लढणे शक्य नव्हते, त्यामुळे ‘मैत्रीपूर्ण लढती’ आहेत असं समजा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
Devendra Fadnavis criticizes Ajit Pawar, Pune
विमान तिकीट मोफत? मेट्रो घोषणेची खिल्ली!
अजित पवारांनी पुण्यातील मेट्रो प्रवासाबाबत केलेल्या घोषणेचीही फडणवीसांनी खिल्ली उडवली. “मेट्रो ही एकट्या राज्याची नाही, त्यात केंद्राचाही वाटा आहे. लोकांचा विश्वास बसेल अशा घोषणा केल्या पाहिजेत,” असा टोला त्यांनी लगावला. पुढे ते मिश्किलपणे म्हणाले, “मी तर घोषणा करणार होतो की, पुण्यातून उडणाऱ्या सर्व विमानांचे तिकीट महिलांना माफ!” त्यांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हंशा पिकला.
ठाकरे बंधूंवर मोठं विधान
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या (Raj & Uddhav Thackeray) संभाव्य युतीवरही त्यांनी भाष्य केलं. “कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते एकत्र आले तर त्याचा आशीर्वाद मलाच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पुण्याच्या विकासावर बोलताना, “पुण्याच्या टेकड्या हिरावल्या जाणार नाहीत, तिथलं अतिक्रमण हटवून पुनर्वसन करू,” असं आश्वासनही त्यांनी पुणेकरांना दिलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
- ‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!
- BMC Election 2026: ऐन निवडणुकीत भाजप-मनसे भिडले; मोठा राडा, ‘त्या’ एका कारणावरून हाणामारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












