Share

‘मूल जन्माला घालणं हा माझ्यासाठी सर्वात आनंदी क्षण नव्हता…’; नॅशनल क्रश गिरीजा ओकचा धक्कादायक खुलासा!

Actress Girija Oak reveals that giving birth wasn’t her “happiest moment” due to the medical chaos, stating the real connection happened a week later.

Published On: 

Actress Girija Oak reveals that giving birth wasn't her "happiest moment" due to the medical chaos, stating the real connection happened a week later.

🕒 1 min read

मुंबई – एका निळ्या साडीतल्या फोटोने जिला रातोरात ‘नॅशनल क्रश’ बनवलं, ती गिरीजा ओक (Girija Oak) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘जवान’ सिनेमा आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे गिरीजा प्रकाशझोतात आली, पण तुम्हाला माहितीय का? पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी गिरीजा खऱ्या आयुष्यात एका ११ वर्षांच्या मुलाची आई आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आई होण्याबद्दल आणि डिलिव्हरीच्या अनुभवाबद्दल जे काही सांगितलंय, ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिनेमात दाखवतात तसं बाळ हातात आलं की आईला स्वर्गीय सुख मिळतं, हे खरं आहे का? गिरीजा म्हणते, “माझ्या बाबतीत तरी असं घडलं नाही.”

Girija Oak on Pregnancy Experience

‘तो’ क्षण सुखद नव्हता…

पॉडकास्टमध्ये बोलताना गिरीजा ओकने डिलिव्हरी रूममधील वास्तव मांडलं. ती म्हणाली, “आपल्याला सांगितलं जातं की, बाळाला पहिल्यांदा कुशीत घेणं हा जगातला सर्वात आनंदाचा क्षण असतो. पण, खरं सांगू? माझ्यासाठी तो ‘सर्वात आनंदी’ क्षण नव्हता. त्या वेळी आजूबाजूला खूप साऱ्या वायरी असतात, डॉक्टर-नर्स असतात, तुम्हाला तुमची स्पेस हवी असते. त्यामुळे ती प्रक्रिया आणि तो क्षण खूप सुखावह असतो, असं मी म्हणणार नाही.” गिरीजाच्या (Girija Oak) या स्पष्टवक्तेपणाचं काहीजण कौतुक करत आहेत, तर काहीजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

याचा अर्थ गिरीजाला मुलाचा आनंदच झाला नाही, असं मुळीच नाही. तिने यामागची दुसरी बाजूही उलगडली. “बाळाचा जन्म झाल्यावर त्याला गोष्टी समजायला वेळ लागतो. माझ्या मुलाच्या, कबीरच्या जन्मानंतर साधारण एका आठवड्याने त्याने जेव्हा माझ्याकडे बघितलं, आमची नजरानजर झाली, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. तो खरा मॅजिकल क्षण होता,” असं गिरीजाने (Girija Oak) स्पष्ट केलं.

जेव्हा गरोदर असलेल्या तरुणी गिरीजाला सल्ल्यासाठी फोन करतात, तेव्हा ती त्यांना खोट्या आशा दाखवत नाही. ती स्पष्ट सांगते, “एक वेळ मूल जन्माला घालणं सोपं जाईल, पण त्यानंतर त्याचं पालनपोषण करणं, त्याला वाढवणं ही खरी कसरत असते.” स्त्री म्हणून एका जीवाला जन्म देणं ही छान भावना आहे, पण ती प्रक्रिया सोपी नसते, हे वास्तव स्वीकारायला हवं, असं मत गिरीजाने मांडलं आहे. तिच्या (Girija Oak) या वक्तव्यामुळे ‘मदरहूड’च्या (Motherhood) ग्लॅमरस चित्रापलीकडील वास्तव चर्चेत आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही