Share

रात्री ‘अपक्ष’, सकाळी ‘राष्ट्रवादी’ची! पिंपरी-चिंचवडमध्ये घडला चमत्कार; गहाळ झालेला एबी फॉर्म नक्की सापडला कुठे?

NCP candidate Jayshree Bhondve gets the official party symbol after High Court intervention and CCTV evidence proved she submitted the AB form on time, overturning her independent status.

Published On: 

Ajit Pawar, sharad pawar | pune Pimpri Chinchwad Election

पुणे (Pimpri Chinchwad)- निवडणुकीच्या काळात काय चमत्कार घडतील, याचा काही नेम नाही. असाच एक भन्नाट प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडलाय. अर्ज छाननीच्या वेळी ज्या उमेदवाराला ‘अपक्ष’ घोषित करण्यात आलं होतं, त्याच उमेदवाराला चिन्ह वाटपाच्या दिवशी चक्क राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ चिन्ह मिळालं आहे! हा जादुई ट्विस्ट नेमका आला कसा? यामागे हायकोर्टाचा दणका आणि सीसीटीव्हीचा पुरावा कारणीभूत ठरलाय.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री भोंडवे (Jayshree Bhondve) यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यांनी एबी फॉर्म वेळेत देऊनही तो गहाळ झाल्याचं सांगत त्यांना छाननीमध्ये अपक्ष ठरवण्यात आलं होतं. पण भोंडवे शांत बसल्या नाहीत. त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओग्राफीचे पुरावे सादर केले. हे पुरावे पाहताच न्यायालयाने फेरसुनावणीचे आदेश दिले.

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर तातडीने सुनावणी घेतली. यावेळी पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध झालं की, भोंडवे यांनी एबी फॉर्म वेळेतच दिला होता. त्यामुळे प्रशासनाने आपली चूक सुधारत, अंतिम यादीत जयश्री भोंडवे यांना अधिकृतपणे ‘घड्याळ’ चिन्ह बहाल केलं. एका रात्रीत चित्र पालटल्याने विरोधकांना मात्र चांगलाच धक्का बसलाय.

कुलाब्यात काय घडलं?

दुसरीकडे, मुंबईत कुलाबा वॉर्डातील अर्जाच्या गोंधळावरही महापालिकेने अहवाल दिलाय. निवडणूक अधिकाऱ्यांनी टोकन देऊनही अर्जदाराला संधी न देणं हे ‘प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य’ असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. याच प्रकरणात जनता दलाने मात्र ‘यू-टर्न’ घेतला असून, विधानसभा अध्यक्षांवर केलेले दबावाचे आरोप मागे घेतले आहेत. “तो केवळ गैरसमज होता,” अशी सारवासारव आता केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आता १२८ जागांसाठी रणसंग्राम सुरू झाला असून, ३२ पैकी १७ प्रभागांत दिग्गजांमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. भोंडवे प्रकरणाने या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install