Share

“५६ इंच छाती आहे ना? मग दहशतवाद्यांना उचलून आणा!”; ओवेसींनी मोदींना दिलं ट्रम्प यांचं उदाहरण!

Asaduddin Owaisi dares PM Modi to show his “56-inch chest” by bringing 26/11 terrorists to India, citing Trump’s recent action in Venezuela as an example.

Published On: 

Asaduddin Owaisi dares PM Modi to show his "56-inch chest" by bringing 26/11 terrorists to India, citing Trump's recent action in Venezuela as an example.

🕒 1 min read

मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे धाडस करून दाखवलं, ते भारताचे पंतप्रधान का करू शकत नाहीत? असा थेट आणि तिखट सवाल आता विचारला जातोय. ‘एमआयएम’चे फायरब्रँड नेते असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मुंबईतील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) थेट ललकारत २६/११ च्या गुन्हेगारांना पाकिस्तानातून उचलून आणण्याचं ओपन चॅलेंज दिलं आहे.

Asaduddin Owaisi Challenges PM Narendra Modi

ओवेसी यांनी नुकत्याच घडलेल्या व्हेनेझुएला प्रकरणाचा दाखला दिला. ते म्हणाले, “मोदीजी, आम्ही तुम्हाला सांगतोय… २६/११ च्या हल्ल्यातील गुन्हेगार, मग तो मसूद अझहर असो किंवा लष्कर-ए-तोयबाचा क्रूर सैतान, जर तुमची छाती ५६ इंचाची आहे, तर तुम्ही ट्रम्पसारखं धाडस केलं पाहिजे. त्या दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा.”

ओवेसी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी मोदींच्या जुन्या घोषणेची आठवण करून देत खोचक टोलाही लगावला. “तुम्हीच म्हणाला होता ना, ‘अब की बार ट्रम्प सरकार’, मग ट्रम्प करू शकतात तर तुम्ही कमी आहात का? जर ट्रम्प त्यांच्या शत्रू देशाच्या राष्ट्राध्यक्षाला बेडरूममधून उचलून आणू शकतात, तर तुम्हालाही हे करावंच लागेल,” असं ओवेसी यांनी ठणकावून सांगितलं.

ओवेसींनी यावेळी अमेरिकेच्या जुन्या कारवायांचीही आठवण करून दिली. अमेरिकेने फक्त व्हेनेझुएलातच नाही, तर १९८९ मध्ये पनामाचा हुकूमशहा मॅन्युएल नोरिएगा आणि २००३ मध्ये इराकचा सद्दाम हुसेन यांनाही अशाच प्रकारे लष्करी कारवाई करून सत्तेवरून खेचलं होतं आणि अटक केली होती.

ओवेसींच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘५६ इंच छाती’ आणि ‘पाकिस्तान’ हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, आता भाजप याला काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही