“मी उद्धव ठाकरेंसारखा ‘बावळा’ नाही…”; आठवलेंच्या कवितेने वरळीत पिकली खसखस, शिंदेंचाही हल्लाबोल!

Union Minister Ramdas Athawale recites a humorous poem mocking Uddhav Thackeray at a Mahayuti rally in Worli ahead of BMC elections.

Published On: 

Union Minister Ramdas Athawale recites a humorous poem mocking Uddhav Thackeray at a Mahayuti rally in Worli ahead of BMC elections.

मुंबई – राजकारणात गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना वातावरणातला तणाव कसा घालवायचा, हे रामदास आठवलेंना (Ramdas Athawale) पक्कं ठाऊक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात सध्या तणावाचं वातावरण आहे, पण वरळीच्या सभेत आठवलेंनी आपल्या खास शैलीत अशी एक कविता सादर केली की, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निमित्त होतं महायुतीच्या संयुक्त प्रचारसभेचं!

येत्या १५ जानेवारीला मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC Election) मतदान होत आहे. ठाकरे ब्रँड विरुद्ध महायुती असा हा सामना रंगलाय. आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत महायुतीने प्रचाराचा धडाका लावला. यावेळी आठवलेंनी भाषणाची सुरुवातच एका चारोळीने केली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

काय होती आठवलेंची कविता?

मी आलेलो आहे वरळीच्या डोममध्ये, पण मी नाही डोम कावळा…

पण मी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा,

माझा रंग आहे सावळा, पण मी राजकारणात नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा

मी नाही नाराज, मी राहिलो नाराज तर मुंबईत कसे येईल राज

मी आलेलो आहे आज.. कारण मुंबईच्या महापौर पदावर चढवायचा आहे साज !

एकत्र आले आहेत फडणवीस आणि शिंदे त्यांनी बंद केले राज आणि उद्धव यांचे धंदे..!

आठवलेंच्या या कवितेने उपस्थितांची मने जिंकली, पण त्यांनी राजकीय टोलेबाजीही सोडली नाही. “एकत्र आले आहेत फडणवीस आणि शिंदे, त्यांनी बंद केले राज आणि उद्धव यांचे धंदे!” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर सडकून टीका केली. “तुम्ही आता मराठी माणसाच्या हिताची दवंडी पिटवताय, मग २० वर्षांपूर्वी कशासाठी वेगळे झाला होतात? तेव्हा तुमचा अहंकार आडवा आला होता,” असा बोचरा सवाल शिंदेंनी केला.

इतकेच नाही तर, “जनतेने तुमचा बँड वाजवल्यावर आता तुम्हाला ‘ब्रँड’ची आठवण आली आहे. खरा ब्रँड तर फक्त बाळासाहेब ठाकरे होते,” अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरे बंधूंना आरसा दाखवला. १५ तारखेला मुंबई कुणाच्या हातात जाणार, याचा फैसला आता जनताच करणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही