🕒 1 min read
लॉस एंजेलिस/मुंबई : मार्व्हलच्या (Marvel) चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली आहे. सर्वांचा लाडका ‘कॅप्टन अमेरिका’ म्हणजेच ख्रिस इव्हान्स (Chris Evans) अधिकृतपणे मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये (MCU) परतला आहे. १८ डिसेंबर २०२५ पासून प्रदर्शित झालेल्या ‘अवतार: फायर अँड ॲश’ (Avatar: Fire and Ash) या सिनेमासोबत ‘अॅव्हेंजर्स: डम्सडे’ (Avengers: Doomsday) या सिनेमाचा पहिला टीझर दाखवण्यात आला. या टीझरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
Captain America Returns in Avengers Doomsday
या टीझरमध्ये सर्वात मोठा धक्का म्हणजे स्टीव्ह रॉजर्सचा नवा लूक. ‘एन्डगेम’नंतर भूतकाळात पेगी कार्टरसोबत राहण्याचा निर्णय घेणाऱ्या स्टीव्हला आता एक मूल (Child) असल्याचे या टीझरमध्ये स्पष्ट झाले आहे. “Steve Rogers will return for Avengers: Doomsday” या ओळीने टीझरचा शेवट होतो तेव्हा थिएटरमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडत आहे. या सिनेमात ख्रिस इव्हान्ससोबतच रॉबर्ट डाउनी ज्युनियर (Robert Downey Jr.) ‘डॉक्टर डूम’च्या भूमिकेत, तर ख्रिस हेम्सवर्थ ‘थोर’च्या भूमिकेत दिसणार आहेत.
एकीकडे टीझरची चर्चा असताना, दुसरीकडे युरोप आणि अमेरिकेतील अनेक थिएटरमध्ये गोंधळ उडाला. मध्यरात्रीच्या ‘अवतार’च्या शोला गेलेल्या अनेक चाहत्यांना हा टीझर दिसलाच नाही. काहींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत “आम्ही फक्त टीझरसाठी आलो होतो,” अशा प्रतिक्रिया दिल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, डिज्नीने प्रेक्षकांना खेचण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. ते एकाच वेळी सर्वत्र टीझर न दाखवता, पुढील चार आठवडे ४ वेगवेगळे टीझर्स बदलून दाखवणार आहेत. त्यामुळे काही थिएटर्सना टीझर मिळाला, तर काहींना नाही. हा सिनेमा १८ डिसेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Box Office Record: शाहरुखचा ‘जवान’ पडला मागे; रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ बनला भारताचा नंबर १ हिंदी सिनेमा!
- दोन हजारांच्या ‘गुलाबी’ नोटांचे पुढे काय झाले? रिझर्व्ह बँकेने दिली मोठी अपडेट; तुमच्याकडे अजूनही नोटा आहेत का?
- मलाही मोठ्या ‘ऑफर’ आल्या होत्या, पण सगळ्यांना पळवून लावलं, तुम्हीही बळी पडू नका! – राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












