Share

‘नकार दिला तर पळवून नेईन’; सोनाली बेंद्रेच्या प्रेमात वेडा झाला होता पाकिस्तानी क्रिकेटर

Read the truth behind the viral rumor that Pakistani cricketer Shoaib Akhtar threatened to kidnap her if she refused his proposal.

Published On: 

Did Shoaib Akhtar really threaten to kidnap Sonali Bendre? The truth behind the viral story on her birthday.

मुंबई : नव्वदच्या दशकात आपल्या निखळ सौंदर्याने आणि साध्या-सरळ अभिनयाने तरुणाईच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे ( Sonali Bendre ) सोनाली बेंद्रे. ‘हम साथ साथ है’ असो किंवा ‘सरफरोश’, सोनालीच्या स्माईलवर फिदा होणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात होती. तिच्याशी जोडलेला एक जुना आणि तितकाच गाजलेला किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा किस्सा आहे ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अर्थात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा.

सोनालीच्या सौंदर्याची जादू सीमेपलीकडेही चालली होती. शोएब अख्तर सोनालीच्या प्रेमात इतका आकंठ बुडाला होता की, त्याने तिला चक्क ‘अपहरणा’ची धमकी दिली होती, अशा चर्चा आजही रंगल्या जातात. नेमकं सत्य काय? जाणून घेऊया.

काय होता तो गाजलेला किस्सा?

काही वर्षांपूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, शोएब अख्तर सोनाली बेंद्रेचा खूप मोठा चाहता होता. तो तिच्या सौंदर्याने इतका घायाळ झाला होता की, आपल्या पाकिटात (Wallet) नेहमी तिचा फोटो ठेवायचा. एवढंच नव्हे, तर एका मुलाखतीत शोएबने असं म्हटल्याचा दावा केला गेला की, “मी सोनालीला लग्नासाठी प्रपोज करेन आणि जर तिने माझा प्रस्ताव नाकारला, तर मी तिचं अपहरण करेन.” हे विधान त्यावेळी प्रचंड गाजलं होतं आणि दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती.

शोएबने स्वतः केला होता खुलासा जेव्हा या चर्चांना उधाण आलं, तेव्हा खुद्द शोएब अख्तरने समोर येत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शोएबने या सर्व बातम्यांना ‘अफवा’ ठरवलं होतं.

यावर बोलताना शोएब म्हणाला होता, “मी सोनाली बेंद्रेचे जेमतेम दोन सिनेमे पाहिले असतील. खरं सांगायचं तर मी कधी तिचा फॅन नव्हतो आणि तिला कधी भेटलोही नाही. मी फक्त तिला मोठ्या पडद्यावर पाहिलं आहे, यात शंका नाही की ती खूप सुंदर दिसते. पण माझ्या आणि तिच्या अफेअरच्या किंवा अपहरणाच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.”

…तेव्हा मात्र मी तिचा फॅन झालो!

शोएबने यावेळी सोनालीच्या जिद्दीचं कौतुकही केलं. तो म्हणाला, “जेव्हा सोनालीला कॅन्सर झाला आणि तिने ज्या धैर्याने त्या आजाराशी लढा दिला, ते पाहून मात्र मी तिचा फॅन झालो. तिने स्वतःच्या संघर्षातून इतर महिलांना एक नवी उमेद दिली आहे. एक खंबीर स्त्री म्हणून मला तिचा नक्कीच आदर आहे.”

सोनालीचं आनंदी वैवाहिक आयुष्य या सर्व चर्चा आणि अफवांच्या पलीकडे सोनाली बेंद्रे आपल्या आयुष्यात स्थिर आहे. तिने चित्रपट निर्माते गोल्डी बहल यांच्याशी लग्न केले असून, त्यांना रणवीर नावाचा एक मुलगा आहे. कॅन्सरवर यशस्वी मात केल्यानंतर सोनाली आता पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि टीव्ही रिअॅलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install