Share

रोहित-विराट नसल्याने भारत-पाक सामन्याचे तिकीट कोणीच खरेदी करेना, ५० टक्के जागा रिकाम्या

Tickets for India vs Pakistan Asia Cup match not selling due to absence of Rohit and Virat.

Published On: 

Rohit Sharma's Funny Interview Clip 'Players ke sath gandi baatein karni chahiye'

दुबई, ता. १२: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याची तिकिटे विकली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सामन्यासाठी अजूनही निम्मी तिकिटे शिल्लक असून, चाहते स्टेडियमकडे पाठ फिरवत आहेत. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने यामागचे महत्त्वाचे कारण सांगितले आहे. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली ( virat kohli ) या स्पर्धेत सहभागी नसल्यानेच तिकिट विक्रीवर परिणाम झाल्याचा दावा त्याने केला आहे.

आशिया कपमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. मात्र, कोणत्याही सामन्याला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. क्रिकेटच्या चाहत्यांना या महासंग्रामाची प्रचंड उत्सुकता असते. भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटलं की, स्टेडियम भरून जातो, पण १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यासाठीही तिकीट खरेदीसाठी लोकांमध्ये उत्साह दिसत नाहीये. आकाश चोप्रा यांच्या मते, केवळ तिकिटे महाग असल्यामुळे किंवा कामाच्या दिवसांमुळे ही परिस्थिती उद्भवली नाही. यामागे विराट आणि रोहित यांची अनुपस्थितीच प्रमुख कारण आहे.

India vs Pakistan Match Tickets Go Unsold in Asia Cup

आकाश चोप्राने सांगितले की, “विराट आणि रोहित हे असे खेळाडू आहेत, जे चाहत्यांना स्टेडियममध्ये खेचून आणतात. जेव्हा विराट रणजी ट्रॉफी खेळायला गेला होता, तेव्हा स्टेडियम खचाखच भरले होते. त्यामुळे, त्यांच्या अनुपस्थितीमुळे तिकीट विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.”

चोप्राने पुढे सांगितले की, जर हे दोन खेळाडू संघात असते, तर स्टेडियममधील प्रेक्षकांची संख्या दुप्पट झाली असती. त्यांच्या मते, सामान्यपणे ५,००० लोक सामना पाहायला आले असते, पण विराट-रोहित असते तर ही संख्या किमान १०,००० ते १५,००० पर्यंत गेली असती. या खेळाडूंना मैदानावर प्रत्यक्ष पाहण्याची संधी क्वचितच मिळते, त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीचा मोठा फरक पडतो, असेही त्याने नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही