आमदाराच्या मारहाणीचे विधान परिषदेत पडसाद: ‘टॉवेल, बनियानवरील आमदाराला लगाम घाला!’

MLA Sanjay Gaikwad’s assault on staff sparks outrage in Maharashtra Legislative Council.

Published On: 

MLA Sanjay Gaikwad's assault on staff sparks outrage in Maharashtra Legislative Council.

मुंबई: शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवास कँटिनमध्ये एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर याचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. निकृष्ट जेवण दिल्याच्या रागातून गायकवाड ( Sanjay Gaikwad ) यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हटले, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनता सुसंस्कृत नेते म्हणून पाहते. अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील एक माजलेला आमदार टॉवेल, बनियानवर कँटिनमध्ये येऊन कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग स्टाईलमध्ये मारत आहे.” सरकारचा आमदारांवर वचक आहे की नाही, असा संतप्त सवालही परब यांनी उपस्थित केला.

Sanjay Gaikwad assault on a canteen worker

परब यांनी गायकवाड यांच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेत विचारले, “निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाले म्हणून बनियान, टॉवेलवर जाऊन आमदाराने मारहाण करावी का? आमदाराने किमान काही संकेत पाळायला नको का? ही काय रस्त्यावरची, गल्लीतली माणसे आहेत का? तुमच्यात (आमदार) ताकद असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांना मारून दाखवा. त्या कर्मचाऱ्याचा काय गुन्हा होता?” मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या अशा लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत, अनिल परब यांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. अनिल परब यांच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) यांचे वर्तन विधिमंडळ सदस्यास भूषणावह नाही. आमदार निवासात सोयी-सुविधा नसतील तर तक्रार करायला हवी होती. पण आमदारांनी मारहाण करणे चुकीचे आहे.” तसेच, विधिमंडळ अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींनी याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही