🕒 1 min read
iPhone 17 : Apple च्या पुढील iPhone 17 सीरिजविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. विश्वसनीय टिपस्टर रॉस यंग यांच्या माहितीनुसार, यंदाच्या स्टँडर्ड iPhone 17 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असू शकतो. यासह स्क्रीन साइजमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. iPhone 16 च्या तुलनेत ही मोठी अपग्रेड मानली जात आहे.
iPhone 17 मध्ये 6.27 ते 6.3 इंचाचा OLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, जो गेल्या वर्षीच्या 6.1 इंचाच्या iPhone 16 डिस्प्लेपेक्षा मोठा असेल. सर्वात मोठा बदल म्हणजे स्टँडर्ड मॉडेलमध्ये पहिल्यांदाच 120Hz ProMotion टेक्नॉलॉजीचा समावेश होऊ शकतो.
What could be special about iPhone 17?
Apple ने ही टेक्नॉलॉजी पूर्वी फक्त प्रो सीरिजमध्ये दिली होती. यामुळे नॉन-प्रो युजर्ससाठी स्मूथ स्क्रोलिंग आणि अॅनिमेशनचा अनुभव मिळणार आहे. iPhone 16 आणि 16 Plus मध्ये फक्त 60Hz डिस्प्ले होता, त्यामुळे हा अपग्रेड खूप महत्त्वाचा मानला जातो.
iPhone 17 सीरिजमध्ये एकूण चार मॉडेल्स असण्याची शक्यता आहे – iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, आणि iPhone 17 Pro Max. यामध्ये iPhone 17 Air मध्ये 6.5 इंचाची मोठी स्क्रीन असेल, तर प्रो मॉडेल्समध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले असू शकतो.
परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाल्यास, iPhone 17 आणि Air मॉडेल्समध्ये A18 किंवा A19 चिप आणि 8GB RAM असू शकते. तर प्रो आणि प्रो मॅक्समध्ये A19 Pro चिपसह 12GB RAM देण्यात येऊ शकते.
Apple ने अद्याप या डिव्हाइसेसची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी ही माहिती मिळाल्यानंतर अनेक iPhone युजर्समध्ये उत्सुकता वाढली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महिला आयोग अपयशी, रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या – रोहिणी खडसे
- ‘झापुक झुपूक’ स्टार सूरज चव्हाणला शाहीर दादा कोंडके पुरस्कार; ‘लय भारी वाटतंय’ म्हणत चाहत्यांचे आभार
- “विराट कोहलीसाठी ट्रॉफी जिंकणार”, कॅप्टन रजत पाटीदार म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












